World Cup : टीम इंडियाची टेन्शन वाढलं; दिग्गज शुभमन गिल रूग्णालयात दाखल
Shubman Gill Hospitalized In Chennai : विश्वचषकातील पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चितपट करत भारतीय संघाने (Team India) विजयी सुरूवात केली आहे. त्यानंतर आता भारताचा दुसरा सामना अफगाणिस्थानशी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताचा दिग्गज खेळाडू शुभमन गिलला (Shubman Gill) तब्येतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तानच्या (India Pakistan Match) महामुकाबल्यासाठी गिल खेळण्याची शक्यता धूसर झाली असून, यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.
प्लेटलेट्स कमी झाल्याने दाखल केले रूग्णालयात
विश्वचषकाला सुरूवात होण्यापूर्वी शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्याने चेन्नई येथे झालेल्या ऑस्टेलियासोबतच्या सामन्याला मुकला होता. त्यानंतर तो उद्या (दि. 11) होणाऱ्या अफगाणिस्तानसोबत मैदानात दिसेल असा अंदाज चाहत्यांना होता. मात्र, आता त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकले आहेत.
टीम इंडिया दिल्लीत तर, शुभमन गिल चेन्नईत
चेन्नईमध्ये विजयी सुरूवात केल्यानंतर आता भारतीय संघाचा पुढचा सामना दिल्लीत अफगाणिस्तानसोबत होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ चेन्नईहून दिल्ली दाखल झाला आहे. मात्र, गिलची तब्येत बिघडल्याने त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली चेन्नईतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थीती पहता येत्या14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अहमदाबाद येथील पाकिस्तानसोबतच्या हायवोल्टेज सामन्यात तो मैदानात दिसण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
Video : हवेत झेप घेत विराटचा अप्रतिम झेल, ऑस्ट्रेलियाचा इनफॉर्म बॅटसमन तंबूत
2023 मध्ये आश्चर्यकारक रेकॉर्ड
शुभमन गिल या वर्षातील वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 20 सामन्यांत त्याने 72 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत. यात दुहेरी शतकाचाही समावेश आहे. एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत गिल दुसऱ्या स्थानावर आहे. असा फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूची विश्वचषकातील पहिल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही अनुपस्थिती संघाला जाणवली होती.