Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पोळ यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. यापूर्वीही त्यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली असल्याचा आरोप आहे.
ठाणे-कळवा (Thane Kalwa) येथील मनिषा नगर भागात ही घटना घडली आहे. त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र हा कार्यक्रम एक बनाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पोळ काही यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. मात्र शाईफेक करत पोळ यांना मारहाण कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या प्रकारावरुन ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचे म्हटले जात आहे.
सिद्धरामय्या महाराष्ट्रातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार ! एक सभा घेणार, पवारांनाही भेटणार
कळवा येथील मनीषा नगर भागात अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर त्यांना मारहाण करत अंगावर मोठ्या संख्येने धावून आल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन… pic.twitter.com/YKMQWbiFAr
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) June 17, 2023
अयोध्या पोळ यांना हा कार्यक्रम ठाकरे गटाचा म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून सापळा रचण्यात आला असल्याचे शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.