Barty Fellowship Strikes: बार्टीच्या फेलोशिपसाठी गेल्या 50 दिवसांपासून शेकडो मागासवर्गीय विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आजच्या काळात शिक्षणासाठी आंदोलन करावं लागणे दुर्दैवी असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, हक्काच्या फेलोशिपसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज आजाद मैदान येथे भेट घेतली. शिक्षणातून नवीन पिढी उभी राहत असते. त्यासाठी आंदोलन करावं लागणे दुर्दैवी आहे. इतर संस्थांच्या मागे निवडून दिलेले प्रतिनिधी उभे राहतात, त्यांना हाताखाली घेतल्याशिवाय विषय सुटणार नाही. आमदार-खासदारांच्या घराला घेराव घातल्याशिवाय या विद्यार्थ्यांची दखल घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
देशातील तब्बल 29 मुख्यमंत्री करोडपती ; श्रीमंतीत ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री नंबर वन
राज्यातील विविध विद्यापीठांमधील शेकडो मागावर्गीय विद्यार्थी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडे सामाजिक न्याय विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सामाजिक न्याय विभाग स्वत: मुख्यमंत्र्यांकडे आहे. गेल्या 50 दिवसांपासून मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी या आंदोलनाकडे फिरकले नाहीत.