देशातील तब्बल 29 मुख्यमंत्री करोडपती ; श्रीमंतीत ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री नंबर वन

देशातील तब्बल 29 मुख्यमंत्री करोडपती ; श्रीमंतीत ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री नंबर वन

Richest CM in India : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) संस्थेच्या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे, की निवडणुकीतील हमीपत्रातील माहितीनुसार देशातील 30 पैकी तब्बल 29 मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत.

आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त 15 लाख रुपयांची संपत्ती आहे.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग: नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल गांधींची भेट

न्यूज एजन्सी पीटीआयनुसार एडीआर आणि इलेक्शन वॉचने (न्यू) म्हटले आहे, की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व 30 मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले गेले. त्यानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचता आले. विश्लेषणात सहभागी करून घेतल्या गेलेल्या 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 करोडपती आहेत. ज्यांची संपत्ती 33.96 कोटी रुपये प्रति व्यक्ति आहे.

एडीआरच्या अहवालानुसार, 30 पैकी 13 मुख्यमंत्र्यांनी हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि धमक्यांशी संबंधित अपराधिक प्रकरणांची माहिती शपथपत्रात दिली आहे.

संपत्तीच्याबाबतीत प्रथम तीन मुख्यमंत्र्यांच्या यादीत जगनमोहन रेड्डी (510 कोटी रुपयांपेक्षा जास्त), अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू दुसऱ्या (163 कोटी रुपयांपेक्षा जास्त) आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (63 कोटी रुपयांपेक्षा जास्त) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा

 

केजरीवाल-नितीशकुमार 3 कोटींचे मालक 

सर्वात कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्र्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आघाडीवर आहेत. ममता बॅनर्जींकडे 15 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे 1 कोटींपेक्षा जास्त तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडेही 1 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे. अहवालानुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांकडेही 3 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.

दरम्यान, या मुख्यमंत्र्यांकडे इतकी संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणुकीवेळी शपथपत्रात सांगितले आहे. या संपत्तीचे आकडे पाहिल्यावर लक्षात येते की राज्याचा कारभाऱ्यांकडे किती पैसा आहे.

वन बाय वन प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री आणि त्यांची संपत्ती किती?

1. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे 510 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
2. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमाखंड यांच्याकडे 163 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
3. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे 63 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
4. नागालँड चे मुख्यमंत्री यांच्याकडे 46 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
5. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांच्याकडे 38 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
6. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे 09 कोटी 37 लाख रुपयांची संपत्ती आहे.
7. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्याकडे 08 कोटी 92 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
8. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांच्याकडे 08 कोटी 22 लाख रुपयांची संपत्ती आहे.
9. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सर्मा यांच्याकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
10. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे एक कोटी रुपयांची संपत्ती आहे.
11.हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे एक कोटी रुपयांची संपत्ती आहे.
12. – 13.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी तीन तीन कोटी रुपयांची संपत्ती.
14. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे 04 कोटी 64 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
15. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एक कोटी 34 लाख रुपये संपत्ती आहे.

असद अहमदच्या इन्काऊंटरनंतर मुख्यमंत्री योगींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

16.छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे 23 कोटी 55 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
17. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सारे यांच्याकडे आठ कोटी 51 लाख इतकी संपत्ती आहे.
18. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडे आठ कोटी 88 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
19. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडे 23 कोटी 55 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
20. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत माने यांच्याकडे एक कोटी 97 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
21. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह एक कोटी 47 लाख रुपये संपत्ती आहे.
22. मध्य प्रदेश मुख्यमंत्री विजय सिंग चव्हाण यांच्याकडे सात कोटी 66 लाख रुपयांची संपत्ती आहे.
23. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटी 50 लाख रुपयांची संपत्ती आहे.
24. मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्याकडे तीन कोटी 84 लाख रुपये इतकी संपत्ती आहे
25. मेघालय चे मुख्यमंत्री कॉनराड संगमा कडे 14 कोटी सहा लाख रुपयांची संपत्ती आहे.
26. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे सहा कोटी ५३ लाख रुपयांची संपत्ती आहे.
27. सिक्कीम चे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याकडे तीन कोटी 79 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
28. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांच्याकडे 13 कोटी 90 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
29. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडे सात कोटी 81 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.
30. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सगळ्यात कमी म्हणजेच 15 लाख रुपये इतके संपत्ती आहे.

31.जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सध्या मुख्यमंत्री नाहीत.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube