असद अहमदच्या इन्काऊंटरनंतर मुख्यमंत्री योगींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Asad Ahmed Encounter Yogi adityanath Video Viral : उमेश पाल हत्येप्रकरणी (Umesh Pal murders Case)वॉन्टेड गँगस्टर अतिकचा (atiq Ahmed)मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मदचं (Ghulam Mohammad) यूपी पोलिसांनी (UP Police) इन्काऊंटर (Encounter)हत्या केली. झाशीच्या बारागाव येथील एका धरणाजवळ ही चकमक झाली. या दोघांवर सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या दोघांकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. असदचा एन्काउंटर होताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल(Viral Video) होत आहे.
Supriya Sule : पती गमाविलेल्या महिलांबाबातच्या निर्णयावरून सुप्रियाताई सुळे राज्यसरकारवर संतापल्या
उमेश पाल यांच्या हत्येनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ते मातीत मिसळणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री योगी म्हणाले होते की, यूपीमधील माफियांविरोधातील कारवाई हे उदाहरण बनले आहे. याप्रकरणीही सरकार कठोर कारवाई करेल.
Mitti me Milana shuru 🔥
Asad, son of mafia-turned-politician #AtiqAhmed and Ghulam S/o Maksudan, both wanted in #UmeshPal murder, Prayagraj and carrying a reward of Rupees five lakhs each; killed in encounter with the UPSTF team at Jhansi. pic.twitter.com/RwAY5suhEh
— Sushil Sancheti 🇮🇳 (@SushilSancheti9) April 13, 2023
माफिया अतिकचा मुलगा चकमकीत ठार झाल्याची बातमी येताच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक त्यांच्या स्तुतीचे पूल बांधू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी यांचं विधानसभेतील मातीत मिसळवणार असल्याचं ट्वीट सोशल मीडियावर लोकं ट्विट करत आहेत.
अतिक अहमदचा फरार मुलगा चकमकीत मारला गेल्यानंतर उमेश पालची आई शांती देवी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. न्याय मिळाल्याबद्दल मी मुख्यमंत्री योगींचे आभार मानते आणि यापुढेही आम्हाला न्याय देण्याचे आवाहन करते, असे त्यांनी म्हटलं आहे. हीच माझ्या मुलाला खरी श्रद्धांजली असल्याचं शांती देवींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यूपी एसटीएफचे अभिनंदन केले आहे.