दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग: नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल गांधींची भेट

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग: नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल गांधींची भेट

Nitish Kumar met Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहेत. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हेही खर्गे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत मोठी चर्चा झाल्याचे समजते.

बिहारचे मुख्यमंत्री तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही ईडीच्या कार्यालयातील चौकशीसंदर्भात दिल्लीला गेले होते. त्याचवेळी सीएम नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह आणि मंत्री संजय झा देखील आहेत. या बैठकीला बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश सिंह देखील उपस्थित होते.

राहुल गांधी हाजीर हो! मोदी आडनाव अवमानप्रकरणी अडचणी वाढल्या

विरोधी पक्षांच्या या नेत्यांची बैठक बंद खोलीत झाली. भाजप विरोधात विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा झाल्याची अटकळ बांधली जात आहे. खरे तर विरोधी पक्षांना ऐक्यासाठी नितीश कुमार सातत्याने काँग्रेसशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना फोन केला होता. त्यानंतर तब्बल 7 महिन्यांनंतर पुन्हा एकदा नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेस नेते सलमान खुर्शीदही उपस्थित होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र येण्याचा आग्रह करत आहेत.

Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन

याआधी नितीश कुमार यांनी राजद प्रमुख लालू यादव यांची भेट घेतली होती. दिल्लीस्थित मीसा भारती यांच्या निवासस्थानी लालू यादव यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार जेडीयूचे खासदार वशिष्ठ नारायण सिंह यांनाही भेटायला गेले. मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात नितीश कुमार काँग्रेसशिवाय इतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना भेटणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube