राहुल गांधी हाजीर हो! मोदी आडनाव अवमानप्रकरणी अडचणी वाढल्या

राहुल गांधी हाजीर हो! मोदी आडनाव अवमानप्रकरणी अडचणी वाढल्या

Rahul Gandhi’s problem increases : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं दिसून येतंय. आता पाटणाच्या एमपी-एमएलए न्यायालयानं (MP-MLA Courts of Patna) मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना 25 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी राहुल गांधींना नोटीस पाठवून 12 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राहुल गांधी आज न्यायालयात पोहोचले नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 एप्रिलला होणार आहे. त्या दिवशी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Mumbai High Court : ‘धनगड’ की ‘धनगर’ मुद्देसूद पुरावे सादर करा…

बिहारचे (Bihar)माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi)यांनी 18 एप्रिल 2019 रोजी पटना येथील एमपी-एमएलए न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. कर्नाटकातील (Karnataka) जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी आडनाव असलेल्यांना चोर संबोधल्याचा आरोप आहे.

भाजप नेते सुशील मोदी यांचे वकील एसडी संजय आणि प्रिया गुप्ता यांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी त्यांना बुधवारी न्यायालयात हजर राहायचे होते. मात्र ते मुद्दाम न्यायालयात पोहोचले नाही. ते केरळमध्ये रॅली करत आहेत. अशा स्थितीत त्यांनी कोर्टाकडे राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. पुढील सुनावणीला राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

त्याचवेळी राहुल गांधी यांच्याकडून त्यांचे वकील अंशुल यांनी पाटणा न्यायालयात त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले की, गुजरातच्या सूरत न्यायालयात अशाच आणखी एका प्रकरणाची सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सुनावणीसाठी राहुलची कायदेशीर टीम तयारी करत आहे.

अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या हजेरीची तारीख वाढवावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. मोदी आडनाव अवमानप्रकरणी सूरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube