Download App

शिंदे सरकारचा मोठा निर्णय : बार्टीच्या ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप

Barti Student Get Fellowship : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर फेलोशिपची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली आहे. 

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएच.डी साठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत.

प्रकाश आंबेडकरांचा आमदार-खासदारांना इशारा; बार्टीची फेलोशिप द्या, अन्यथा… – Letsupp

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांची या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट घेतली. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.

बार्टी मार्फत मिळणार्‍या शिष्यवृत्ती पासून वंचित असलेल्या ८६१ पीएच.डी विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नसती तर न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही कल्याण जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी दिला होता. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी तीन योजना कार्यान्वित आहेत. यामध्ये प्रामुख्याने सारथी, महाज्योती, बार्टी यांचा समावेश आहे.

Tags

follow us