Download App

भिवंडीत रक्तरंजित थरार! भाजप पदाधिकाऱ्यासह एकाची निर्घृण हत्या; कार्यालयातच संपवलं, मारेकरी फरार

Bhiwandi Crime News BJP Leader Killed : भिवंडी शहरातून एका खळबळजनक बातमी (Bhiwandi Crime) समोर आली आहे. भिवंडीमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. यातील एक व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचं (BJP Leader Killed) समोर आलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (Praphull Tangdi) आणि तेजस तांगडी यांचा (Tejas Tangdi) समावेश आहे. या घटनेने भिवंडी शहर पुरते हादरून गेले आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे घडली. या घटनेने परिसरात मोठा गदारोळ उडाला आहे.

हल्लेखोर नेमके कोण होते?

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले अन् पुढील तपास सुरु (Crime News) केलाय. हल्लेखोर नेमके कोण होते? हे अजून कळू शकलेलं नाही. परंतु पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सिंह, कर्क राशींसाठी आजचा दिवस कठीण, तुमच्या नशिबात काय लिहिलंय? जाणून घ्या एका क्लिकवर…

पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल तांगडी जेडीटी इंटरप्रायसेस या त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारी देखील होते. दरम्यान, रात्री 11 वाजताच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी तेथे येऊन हल्ला केला. ज्यामध्ये प्रफुल्ल तांगडी यांचा मृत्यू झालाय. तांगडी यांच्यावर एक वर्षा पूर्वी देखील प्रफुल्ल अशाच पद्धतीने हल्ला झाला होता. परंतु त्या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना त्रास देण्यास सुरुवात; वाचा, नक्की काय घडलं?

भिवंडी शहर हादरले

प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय. मारेकरी सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहे. हत्या नेमकं कुठल्या कारणावरून करण्यात आली? याचा शोध देखील पोलीस घेत आहे. ही घटना एक वर्षापूर्वी घडलेल्या दुसऱ्या हल्ल्याशी संबंधित असू शकते, ज्यात प्रफुल्ल तांगडी केवळ बचावले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्याच्या घटनेबाबत तपास सुरू आहे.

ही घटना भिवंडी शहराच्या राजकीय आणि गुन्हेगारी दोन्हीच वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करणारी आहे. अद्याप हल्लेखोर कोण आहेत, किंवा या हल्ल्याचं वास्तव कारण काय आहे, याबाबत पोलिस तपासात गुंतले आहेत.

 

follow us

संबंधित बातम्या