छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, भिवंडीतून एकाला अटक
Bhiwandi Crime : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातून एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने यापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी कारवाई करताना ठाणे पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर भावना दुखावल्याचा आरोप आहे. तरूणाला ठाण्यातील भिवंडी येथून अटक करण्यात आली आहे.
Bhiwandi police detained a minor for his derogatory social media posts against Chhatrapati Shivaji Maharaj. A case under relevant sections of the IPC was registered by the police and the minor was taken into custody: Thane police
— ANI (@ANI) May 7, 2023
दरम्यान तरुणाने इंस्टाग्राम पोस्टवर वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. या पोस्टमध्ये तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी तरुणाविरुद्ध कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कर्नाटकात कोणाची सत्ता येणार ? भाजपला डिवचत शरद पवारांनी सांगितला अंदाज
दुसरीकडे भिवंडीचे डीसीपी नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. तरुण हा अल्पवयीन आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.