Download App

मुंबईच्या काळचौकी परिसरातील बीएमसीच्या शाळेत स्फोट, एकापाठोपाठ 8 सिलिंडर फुटले

  • Written By: Last Updated:

Mumbai Kalachowki Area Fire Accident : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनीत (Mint Colony) भीषण आग लागली आहे. आठ सिलिंडरचा स्फोट (Cylinder blast) झाल्याचे वृत्त आहे. हवेत धूराटे लोट पसरले आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत.

कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; रिलीजच्या 3 दिवशी केली एवढी कमाई 

मागील गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आज मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनीमध्ये 7 ते 8 घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सर्वत्र आरडाओरडा आणि धावपळ सुरू आहे. लालबाग काळाचौकीजवळील गिरनार टॉवरमागील साईबाबा झोपडपट्टीत ही भीषण आग लागली. एकापाठोपाठ आठ सिलिंडरचा स्फोट झाल्याची बातमी आहे.

Ahmednagar News : ज्यांना साखर कडू लागते, त्यांनी लाडू वाटावेत, सुजय विखेंचा विरोधकांना टोला 

या झोपडपट्टीत सुमारे दीड हजार लोक राहतात. आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. सिलिंडरच्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बीएमसीच्या बंद असलेल्या साईबाब पाथ शाळेत ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या शाळेचा वापर कोविडमध्ये झाला होता. यानंतर शाळा बंद करण्यात आली. मात्र त्यावेळी वापरलेले ऑक्सिजन सिलिंडरही तेथे पडून होते. यात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं आतमध्ये गाद्यांनी पेट घेतला आणि आग वाढत गेली.

बचाव कार्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या बंद शाळेतील सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही.

follow us