Download App

धारावीत भीषण आग, 25 घरं जळून खाक

मुंबई : शाहूनगर परिसरातील (Shahunagar) कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये (Kamala Nagar Slum) पहाटे भीषण आग (Mumbai Fire) लागल्याचं दिसून आलं. या आगीत 25 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती आहे.

मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi) परिसरात असलेल्या कमला नगरच्या झोपडपट्टीत पहाटे 4 च्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल तीन तास ही आग पाहायला मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेच शिवसेनेचे बॉस, मुख्यनेतेपदी निवड

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. दाटीवाटीचा परिसर आणि अरुंद रस्ते यामुळं अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.

धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. धारावीतील शाहुनगरमधील कमला नगर म्हणजे, मोठा दाटीवाटीचा भाग आहे.

या झोपडपट्टीत अनेक लहान मोठी घरं दाटीवाटीनं एकमेकांना खेटून उभी आहेत. या ठिकाणी अनेक लहान दुकानंही आहेत. आग लागलेल्या परिसरात लेदरची अनेक दुकानं आहेत. अनेक लहान-मोठी कपड्यांचे कारखाने देखील आहेत. त्यामुळं आग वाढण्यास हातभार लागत होता.

Tags

follow us