महाराष्ट्रातून चार खासदारांना संसदरत्न, राष्ट्रवादीचे दोन तर भाजपच्या दोन खासदारांचा समावेश

महाराष्ट्रातून चार खासदारांना संसदरत्न, राष्ट्रवादीचे दोन तर भाजपच्या दोन खासदारांचा समावेश

नवी दिल्ली : यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून चार खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. संसदरत्न पुरस्कारासाठी देशभरातून 13 खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहेत.

यामध्ये महाराष्ट्रातून लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, गोपाळ शेट्टी, हिना गावित, आणि राज्यसभा खासदार फौजिया खान यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, यांचाही समावेश आहे.

MPSC Student Protest : आमदार सत्यजित तांबेंची पुण्यात धाव, विद्यार्थ्यांची घेतली बाजू

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस कृष्णमूर्ती यांच्या सह-अध्यक्षपदी असलेल्या प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाच्या ज्यूरीने खासदारांना नामनिर्देशित केले आहे.

Ajit Pawar Hoarding : ‘महाराष्ट्राचे  भावी मुख्यमंत्री अजितदादा’, पोस्टरची सर्वत्र चर्चा

ज्युरीने विशेष पुरस्कार श्रेणी अंतर्गत दोन विभागांशी संबंधित स्थायी समित्या आणि एका प्रतिष्ठित नेत्याला नामनिर्देशित केले. या समितीमध्ये प्रतिष्ठित खासदार आणि नागरी समाजाचे सदस्य यांचा समावेश आहे.

Ashok Chavan : “आम्हाला सांगण्याऐवजी तुझ्या बहिणीला जाऊन सांग ना?” अशोक चव्हाण यांचा विनायक मेटे कोण करतंय?

17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2022 संपेपर्यंत प्रश्न, खाजगी सदस्यांची विधेयके आणि सदस्यांवरील चर्चेदरम्यानच्या त्यांच्या कामगिरीवर या पुरस्कारासाठी नामांकन केले गेले आहे.

तर राज्यसभेतून सध्याचे सदस्यांतून सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा आणि राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांची निवड करण्यात आली आहे. विश्वंभर प्रसाद निषाद आणि छाया वर्मा (काँग्रेस) यांना त्यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सेवानिवृत्त सदस्य श्रेणी अंतर्गत नामांकन देण्यात आले आहे.

‘आता आम्हाला शिवसेना म्हणा’, शिंदे गटाकडून पत्रक प्रसिद्ध

दरम्यान, वित्त समिती (लोकसभा समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा) आणि परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समिती (राज्यसभा समितीचे अध्यक्ष व्ही विजयसाई रेड्डी, YSR काँग्रेस) यांना 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकित करण्यात आले आहे. २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube