‘आता आम्हाला शिवसेना म्हणा’, शिंदे गटाकडून पत्रक प्रसिद्ध
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी शिंदे गटाला शिवसेना असे संबोधावे, अशी विनंती शिंदे गटाकडून एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे सजिव संजय मोरे यांनी याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. पत्रकात म्हटले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या संपादकांनी यापुढे शिंदे गटाचा शिवसेना असा उल्लेख करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
तसेच याबाबतची सर्व माहिती आणि कल्पना आपण आपल्या प्रतिनिधी व सबंधित विभागाला देण्यात यावी, असंही म्हटंलय. हे पत्रक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
संजय राऊत भडकले.. म्हणाले कोश्यारी खोटारडे; १२ आमदारांच्या मुद्द्यावर दिले प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादाला पूर्णविराम दिलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील अनेक ठिकाणी शिंदे गट आणि उध्दव ठाकरे समर्थकांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं. अखेर आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून ‘आता शिंदे गट नाहीतर आम्हांला शिवसेना म्हणा’ असा दावा करण्यात आला आहे.
Sonu Nigam : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून सोनू निगमला धक्का-बुक्की ? व्हिडीओ व्हायरल
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाने सर्वप्रथम विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालायाचा ताबा घेतला आहे. त्यानंतर आता शिवसेना भवनावरही दावा करतात की काय? असा सवाल उपस्थित होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
राज्यपालांनी 12 आमदारांची नावं लटकून का ठेवली? नेमकं कारण आलं समोर…
मात्र, आज दिल्लीतील संसद भवनातील शिवसेना कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. ठाकरे गटाची तोफ संजय राऊतांना या कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, आता आम्हाला शिंदे गट नाही शिवसेना म्हणा, अशीच मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली असल्याचं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. याबाबतचं पत्रकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.