मुंबई : पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे तरीही ते असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांच्या टीकेला भाजपकडून (BJP) पलटवार आला आहे.
भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अहो शरद पवार, एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस जी सुज्ञ आहेत म्हणूनच आजपर्यंत शांत होते. तुम्ही स्वतः भाजप-राष्ट्रवादी सरकार स्थापन करुया असा निरोप दिला होता. पण, तुम्हाला जे हवं ते साध्य झालं नाही म्हणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत नेहमी सारख तुम्ही कोलांटी उडी घेतली, असा आरोप शरद पवार यांच्यावर केला आहे.
पुढं भाजपने म्हटले की, पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं’वाद’ झाला ? अजित पवार तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा निरोप देण्यासाठी सिल्व्हर ओकवर आले होते. शरद पवार, तुम्ही सकाळी केलेलं ट्विट सुद्धा खोटं होतं. अजित पवार तुम्हाला सांगून शपथविधीला आलेले, असा आरोप केला आहे.
Balasaheb Thorat अखेर त्या वादावर बोलले.. माझा हात नीट असता तर…
शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना असत्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले होते. यावर भाजपने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, शरद पवार साहेब, खर तर, ‘सत्य – असत्य’ बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. पवार साहेब, तुम्ही राजकारणात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमीच खोट्याचा आधार घेत इथपर्यंत आलात. तुमचा इतिहास हेच सांगत आहे की, “तुम्ही सहकाऱ्यांचा विश्वासघात करूनच स्वतःला सिद्ध केलात”, असा आरोप भाजपने केला आहे.