देवेंद्र फडणवीस राज्याचे नाही भाजपचे गृहमंत्री, सुषमा अंधारे यांची टीका

पुणे : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नाहीत. ते गृहमंत्री म्हणुन कुचकामी ठरतायत. माझ्या सभा रद्द केल्या जातात आणि तिथच भाजपच्या सभा होतात हा दुटप्पीपणा नाही का, अस म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपचे सोलापूरचे माजी जिल्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडून पत्नी म्हणून हक्क मिळवण्यासाठी लढत […]

Sushma_Andhare

Sushma_Andhare

पुणे : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नाहीत. ते गृहमंत्री म्हणुन कुचकामी ठरतायत. माझ्या सभा रद्द केल्या जातात आणि तिथच भाजपच्या सभा होतात हा दुटप्पीपणा नाही का, अस म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

भाजपचे सोलापूरचे माजी जिल्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडून पत्नी म्हणून हक्क मिळवण्यासाठी लढत असलेल्या निर्मला यादव यांच्यासोबाबत सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटीलही यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या कि निर्मला यादव याही भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी याआधीही भाजपच्या नेत्यांकडे विनंती केली आहे. पण त्यांना न्याय मिळत नाही. हे वाईट आहे. निर्मला यादव यांची तक्रारही देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतली पाहिजे. असं खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.

यावेळी त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील टीका केली. त्या म्हणाल्या की “तुम्ही महिला आयोगाचा देखील अपमान करत आहात. खरंतर महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे. पण आयोगाच्या नोटीसाला अशा खूप नोटीसा येतात अस म्हणत ज्यांनी आयोगाला केराची टोपली दाखवली. अशा बिनकामी बाईला तुम्ही खडसावलं का नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Exit mobile version