Download App

Chitra Wagh : ‘मातोश्रीसमोरचा रस्ता कशामुळे बंद असतो?’ चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल

Chitra Wagh : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी कारण ठरले ठाण्यातील सर्व्हिस रोड वाहतूक शाखेकडून बंद करण्याचे. राऊत यांनी ट्विट करत खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबाला ये जा करण्यासाठी ठाण्यातील अख्खा सर्व्हिस रोड बंद केल्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

वाघ यांनी एक ट्विट केले आहे. मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही काय..?? ठाकरे राजपरिवाराच्या या मातोश्री नामक किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी किती पोलीस पहारे, किती नाकाबंदी आणि किती अडथळे पार करावे लागतात हेही जनतेला कळू द्या. सर्वसामान्यांसाठी मातोश्री समोरचा रस्ता कशामुळे बंद असतो, हेही सांगाच एकदा..

कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्री देवेंद्रजी एकास एक आणि दुसऱ्यास दुसरा, असा भेदभाव करत नाहीत हे आपल्याच उदाहरणावरून कळले असेलच. तुमची महाज्ञानी टिवटिवही देवेंद्रजींच्याच सुरक्षा व्यवस्थेच्या छत्रछायेत चाललेली असते, याचा विसर पडू देऊ नका. तुमच्या सरकारच्या गृहमंत्र्यांनी वसुली धंदे केले, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचे पोलीस कुणाचे मिंधे नाहीत.. हे लक्षात घ्या सर्वज्ञानी, अशा शब्दांत भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

सर्व्हिस रोड सर्वसामान्यांसाठी खुला 

दरम्यान, वाहतूक शाखेकडून बंद करण्यात आलेला हा सर्व्हिस रोड सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. व्हीआयपी कल्चर आम्हाला नको असे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यानंतर कार्यवाही करत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील हा रस्त वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Video : ‘आम्हाला काम नाही, माती खायची का?’ भर रस्त्यात महिलेने बावनकुळेंना फटकारले

Tags

follow us