Download App

‘ही तर कलानगरची बार्बी’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane On Udhdhav Thackeray :  भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यालय उघडल्यावरुन ठाकरे गटाने आक्षेप घेत जोरदार टीका केली. यावरुन नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काही दिवसांपासून आदित्य ठाकरे मुंबईचे पालकमंत्री लोढा यांच्यावर टीका करत आहेत. त्यांना फार मिर्ची लागली आहे, त्यामुळे सतत म्याव म्याव करत आहेत. आदित्य ठाकरे याने तेव्हा काय दिवे लावलेत हे मी सांगणार आहे. यांच्या काळात अस्लम शेखला मुंबई महानगर पालिकेचा बंगला दिला होता. तुमच्या सारखा आम्ही बंगला टक्केवारी आणि वसुलीसाठी घेतलेला नाही. तुमच्या काळात वसुलीसाठी पूर्ण बंगला देऊन टाकला होता, असे म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

केंद्रात मंत्री मराठी अन् महाराष्ट्रातीलच रस्त्यांची दुरावस्था : मुलावरील टीकेनंतर ठाकरेंचं गडकरींवर तोंडसुख

तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनादेखील सुनावले. नुकतीच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावरुन राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राणे म्हणाले की,  “मला वाटलं  ही कलानगरची बार्बीची मुलाखत आहे. त्याला मी मुलाखत म्हणत नाही कलानगरची बार्बी म्हणतो. उद्धव ठाकरेच्या टीकेला का महत्व देतात हे कळत नाही.पगारी नोकराला मुलाखत देण्यापेक्षा विधान भवनात या आणि सरकारला धारेवर धरा. अशी लाईट कमी करून मुलाखत देणे चांगली लक्षण नाहीत. या मुलाखतीच्या खाली 18 प्लस मुलाखत अशी रेटिंग द्यायला हवी.”

मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत… भन्नाट! ठाकरेंच्या मुलाखतीवर बानवकुळेंचा टोला

तसेच उद्धव ठाकरे यांचा मूळ स्वभाव काड्या लावणे  आहे. अजित दादांनी काल उद्धव ठाकरेंची सभागृहात काढली आणि आज हे त्यांचे कौतुक करतात यालाच उद्धव ठाकरे म्हणतात. तुमच्या ढुंगणावर अजितदादांनी लाथ मारलीय, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

Tags

follow us