माझ्या नादाला लागलात तर तुम्हाला तुमची…,गणेश नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा

नव्या निर्णयामुळं नवी मुंबईच्या नियोजनावर दूरगामी आणि गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

News Photo   2026 08 02T150246.476

माझ्या नादाला लागलात तर तुम्हाला तुमची...,गणेश नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा

वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर पुनर्विकास योजनेवर पुन्हा एकदा जोरदार टीका करत गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. अतिधोकादायक नसलेल्या तसेच ३० वर्षे पूर्ण न झालेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयामुळे नवी मुंबईच्या नियोजनावर दूरगामी आणि गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेश नाईक म्हणाले की, नव्या यूडीसीपीआर (युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स) अंतर्गत नवी मुंबईत एफएसआय वाढवण्याचा प्रस्ताव शहराच्या नियोजनाला धक्का देणारा ठरू शकतो. त्यामुळे पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येईल आणि शहराच्या विकासाचे संतुलन बिघडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नाईक यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, “गणेश नाईकच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देणार नाही,” असा अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधत असल्याची चर्चा रंगली आहे.

क्लस्टर पुनर्विकास योजना आणि नव्या यूडीसीपीआरच्या मुद्द्यावरून राज्य सरकारमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याचे चित्र दिसत असून, या वादामुळे नवी मुंबईतील पुनर्विकासाच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version