Aashish Shelar : मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार (Aashish shelar) यांची जीभ घसरलीयं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या गाडीवर हल्ले होत असल्याचे प्रकार घडताहेत. उद्धव ठाकरेंसह (Udhav Thackeray) संजय राऊतांकडून (Sanjay Raut) अश्लिल भाषा आणि शिव्यांचा उपयोग मर्यादा सोडून होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम उबाठा सेनेसह संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलं असल्याची टीका आशिष शेलार यांनी केलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
Video : पत्रकार परिषदेत ‘गुलाबी जॅकेट’वर प्रश्न; गुगली टाकत पवारांकडून अजितदादा ‘बोल्ड’
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, राज्याच्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम उबाठाचे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलंय. भाजपसोबत युती असताना मते आमची घ्यायीच अन् दुसऱ्यासोबत युती करायची, ठाकरे आणि राऊतांनी राजकीय संस्कृतीला काळीमा लावलायं. अश्लिल भाषेचा शिव्यांचा उपयोग, मर्यादा सोडून बोलण्याचे जनक संजय राऊत आहेत. राज्याच्या संस्कृतीला एका अर्थाने काळीमाच नाही तर डांबर लावण्याचं संजय राऊतांचं कर्तृत्व असल्याची टीका आशिष शेलार यांनी केलीयं.
मोठी बातमी : तत्काळ कोठडीची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा
तसेच निवडणुकीआधीच हमरीतुमरी तू का मी…अशी भाषा उद्धव ठाकरेंनी करुन राज्याचं प्रगल्भत्व निर्माण केलंय. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी हे धंदे सुरु केले आहेत, तेव्हापासून राज्यातील जनता त्रस्त आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यावर विरोध, सुपाऱ्या असे प्रकार सुरु झालेत. राज ठाकरे जोपर्यंत शांत तोपर्यंत ठिक आहे अन्यथा उद्धव ठाकरेंची पळताभूई होईल. ठाण्यात झालेल्या शेणहल्ल्यामुळे उद्धव ठाकरे सेनेची फाटल्याचं चित्र दिसून येत असल्याचाही टोला आशिष शेलार यांनी लगावलायं.
Durga Promo: ‘कलर्स मराठी’वर नव्या मालिकांचा धडाका; ‘दुर्गा’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित
दरम्यान, वक्फ बोर्डाच्या ठरावावरुन काही मुस्लिम बांधवांनी मातोश्रीवर आंदोलन केलं असल्याचं दिसून आलं. मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदे यांचेच माणसं असल्याचं म्हणत संजय राऊतांनी आंदोलनकर्ते आणि एकनाथ शिंदेंसोबतचे फोटोच दाखवल्याचं दिसून आले आहेत. त्यावरुन राज्यात राजकारण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा अब्दाली असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.