Download App

पेण, रोहा, चौल…काय मिळाला रायगडकरांचा कौल? आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचलं

Aashish Shelar On Udhav Thackeray : पेण रोहा चौल…काय मिळाला रायगडकरांचा कौल? या शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, काल उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभा पार पडल्या. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना शेरोशायरी करत डिवचलं आहे.

चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण मतदारसंघ मोजत आहे! रामराजेंचा रणजितसिंहावर पुन्हा वार

आमदार आशिष शेलार म्हणाले, ना आपल्या हाती पक्ष..ना पक्षाचे निशाण..ना कुठला अजेंडा… ना हातात भगवा झेंडा..मळमळ जळजळ आणि भाजप द्वेष त्यामुळे ना ग्रामपंचायत सुद्धा जिंकण्याची वॉरंटी…म्हणून हवी जनतेला मोदीजींची गॅरेंटी या शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे महायुतीचे सर्वच घटक पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीला धूळ चारण्यासाठी विरोधकांकडूनही रणनीती आखण्यात येत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंकडूनही दौरे सुरु करण्यात आले आहेत.

‘दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा’; अर्थसंकल्पानंतर काँग्रेस खासदाराची अजब मागणी

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
भाजपने युती तोडली नसते तर आज देवेंद्र फडणवीस पाव नाहीतर पूर्ण मुख्यमंत्री असते, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत केली होती.
तसेच शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केलाय़ं. देशातील गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत, हे धाडस त्यांनी केलं त्यांचे अभिनंदन करत आहे. तुमच्या पंतप्रधानांच्या मित्रापलीकडेही देश आहेत हे आता 10 वर्षानंतर त्यांना कळले. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानूकडे जा? सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही ते म्हणाले.

तसेच मिंधे गटात भेकडे गेले आहेत. भेकडे तर गेलेच अजूनही कोणी असेल तर त्यांनी पण जा. ही भेकड जनता पार्टी आहे, नेते चोरणारी पार्टी, विचारशून्य पक्ष देशावर राज्य करतोयं आधी लोकसभा निवडणूक आहे. आता तळागाळातून सुरुवात नाहीतर कळसावरच भगवा फडकावयचा आहे शिवरायांचा भगवा लाल किल्ल्यावर पुन्हा फडकवणार असल्याचा इशारा ठाकरेंनी दिला.

follow us