Suresh Dhas replies Jitendra Awhad : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील पोलिसांना माफ करा असे आवाहन करणारी एक क्लिप व्हायरल करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आज आमदार धस यांनी प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे.
आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. धस पुढे म्हणाले, परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात सुरू असलेला मोर्चा शांत करण्याचं काम मी करत होतो. पण जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का? जितेंद्र आव्हाडांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असे सवाल आमदार धस यांनी केले. मुंबईला जाणारा लाँग मार्च नाशिकमध्ये थांबला त्यामुळे आव्हाडांना पोटशूळ उठला का असाही सवाल सुरेश धस यांनी विचारला आहे.
मी सुरेश धस यांचा पीए..असं सांगत उकळले सरकारी अधिकाऱ्यांकडून पैसे, धाराशिवमधील धक्कादायक घटना
परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक बाजू घेतलेली आहे. असे असतानाही आव्हाड निगेटिव्ह का पसरत आहेत. या प्रकरणात संबंधित पोलीस निलंबित आहेत. या संबंधी मी केलेले वक्तव्य मोडून तोडून दाखवलं जात आहे. त्या संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा असे मी म्हणालो होतो. मात्र लाठीमाराशी ज्यांचा संबंध नाही. जे व्हिडिओत दिसत नाहीत त्यांना माफ करा असे मी म्हणाल होतो. असे असतानाही माझे वाक्य पूर्ण न घेता अपूर्ण वाक्यावर ट्रायल चालवली जात आहे, असे आमदार सुरेश धस म्हणाले.