मी सुरेश धस यांचा पीए…असं सांगत उकळले सरकारी अधिकाऱ्यांकडून पैसे, धाराशिवमधील धक्कादायक घटना

मी सुरेश धस यांचा पीए…असं सांगत उकळले सरकारी अधिकाऱ्यांकडून पैसे, धाराशिवमधील धक्कादायक घटना

Claiming To Be Suresh Dhass PA Demanded Ransom : धाराशिवमधून (Dharashiv) एक धक्कादायक घटना समोर आलीय. आष्टीचे आमदार आणि भाजप नेते यांचा पीए (Suresh Dhas) आहे, असं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. परंतु सत्य समोर येताच, या पैसे उकळणाऱ्या व्यक्तीला मराठा अधिकाऱ्यांनी चोप दिलाय. पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव आशिष विसाळ असल्याचं समजतंय.

Video : भाजप एकनाथ शिंदेंचाही पक्ष फोडणार? मुनगंटीवार भाजपवरच… पाहा पूर्ण सविस्तर मुलाखत

सुरेश धस यांचा पीए असल्याचे सांगत अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याची घटना धाराशिवमध्ये घडली. त्यानंतर या ठगाला मराठा आंदोलकांनी चांगलाच चोप दिलाय. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात (Dharashiv Crime News) आलंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहेत. नेमकं काय (Dharashiv Crime) घडलं? ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची आहे, धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा आहे, मी सुरेश धस यांचा पीए आहे, असं सांगून एक व्यक्ती अधिकाऱ्यांकडे पैसे मागत होता. याची माहिती मराठा आंदोलकांना (Crime News) मिळाली. त्यानंतर मराठा आंदोलक तिथे पोहोचले, त्यांनी पैसे मागणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला. त्यानंतर ही व्यक्ती चांगलीच गडबडल्याचं दिसून आलं. त्यानंतर मराठा आंदोलकांनी या ठगाला धो-धो धुतला. पोलिसांनी आशिष विसाळ नावाच्या या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय.

“मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात टाकले त्यामुळे..”, जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य

आमदार सुरेश धस यांच्या नावावर आशिष विसाळ हा सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत होता. त्यांच्याकडून खंडणी वसूल करत होता. त्यानंतर मराठा आंदोलकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. विशेष म्हणजे या व्यक्तीने माजी जिल्हाधिकारी प्रवीण गोडाम यांचं नाव आणि फोटो देखील डीपीला ठेवला होता. तसेच आपण गोडाम यांचे खास मित्र असल्याचा दावा करत अधिकाऱ्यांकडून पैसे उकळले होते.

या सर्व प्रकरणावर गोडाम यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. नाशिक माझं कार्यक्षेत्र आहे, जर मराठवाड्यात कोणी माझ्या नावाने पैसे घेत असेल तर पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या, असं आवाहन नाशिकचे आयुक्त अन् धाराशिवचे तात्कालिन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube