“मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात टाकले त्यामुळे..”, जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात टाकले त्यामुळे..”, जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य

Jaya Bachchan on Mahakumbh : उत्तर प्रदेशात महाकुंभ पर्व मोठ्या उत्साहात (Mahakubh 2025) आणि धार्मिक वातावरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी याच महाकुंभात चेंगराचेंगरीची (Mahakumbh Stampede) घटना झाली होती. या घटनेत तीस भाविकांचा मृत्यू झाला होता. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकार टीकेची झोड उठवली आहे. यात आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांची (Jaya Bachchan) भर पडली आहे. जया बच्चन यांनी एक अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाकु्ंभातील पाणी सर्वात प्रदूषित असल्याचे म्हटले.


जया बच्चन म्हणाल्या, या सभागृहात या वेळेस जलशक्ती विभाग घाण पाण्यावर चर्चा करत आहे. यावेळी सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह (चेंगराचेंगरीत मरण पावलेले) नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे. वास्तवातील मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गंगा नदीत मृतदेह फेकून देण्यात आले तेच पाणी लोकांपर्यंत येत आहे.

महाकुंभातील व्हायरल मोनालिसासाठी अर्थसंकल्प ठरलाय वरदान, का? घ्या जाणून सविस्तर 

कुंभात येणाऱ्या सामान्य लोकांसाठी कोणतीही विशेष सुविधा देण्यात आलेली नाही. त्यांच्यासाठी काहीच व्यवस्था येथे नाही. सरकार खोटं बोलत आहे. कोणत्याही वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र कसे येऊ शकतात असा सवाल जया बच्चन यांनी केला. व्हिआयपी लोक कुंभात स्नान करत आहेत. त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जात आहे.

परंतु, जे गरीब लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत त्यांना येथे कोणतेच सहकार्य मिळत नाही. त्यांच्यासाठी काही व्यवस्थाही येथे नाही. कंटेमिनेटेड पाणी सर्वात दूषित असते. आता तरी खरं सांगा की कुंभात नेमकं काय घडलं? महाकुंभात जी घटना घडली त्याची खरी माहिती सरकारने दिली पाहिजे. चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. चौकशी सुरुच राहिल असे जया बच्चन म्हणाल्या. दरम्यान, खासदार बच्चन यांच्या या वक्तव्यावरून वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube