Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात आज भाजप खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. परदेशातून या कार्यक्रमासाठी येणं गरजेचं होतं. पण त्यांना (उद्धव ठाकरे) परतीचं तिकीट काही मिळालं नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
राणे पुढे म्हणाले, अजित पवारांनी सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. पण काही लोकं आली नाहीत. एकत्रित येण्यासाठी हाक द्या नाही आले तर सोडून द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त भाषणं करुन उपयोग होत नाही तर कृतीतूनही दिसायला हवं. या कार्यक्रमाला त्यांनी (उद्धव ठाकरे) परदेशातून यायला हवं होतं. मात्र त्यांना परतीची तिकीटं मिळाली नाहीत. सुनील तटकरे यांनी काय मॅनेज केलं माहिती नाही असे राणे म्हणताच उपस्थितांत हास्य उमटले.
शिवसेना आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो होतो. एक दिवस बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं. मी गेलो बाळासाहेब मला म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद चालवशील का? मी म्हटलो साहेब मुख्यमंत्रिपद पळवेल. बाळासाहेबांनी सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला मुख्यमंत्री केलं, अशा शब्दांत नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, या उपक्रमात महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला गेला. स्वातंत्र्योत्तर काळातनंतर संयुक्त महाराष्ट्र करायला लढा द्यावा लागला. त्यावेळी राजकीय परिस्थिती होती त्यामुळे लढा उभारला गेला १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. ही संयुक्त महाराष्ट्राची गाथा, लढा नवीन पिढीला माहित नाही हा उपक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयातही असा उपक्रम ठेवावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
६५ वर्षात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान हे चांगले आयोजन आहे. सिंहावलोकन केले तर काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले त्या सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा उचलला आहे. अशा नेत्यांचा सन्मान व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार आयोजित केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले.
मी गंमतीने म्हटलो, माझे शब्द मागे घेतो; मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर अजित पवारांचा युटर्न