BJP MP Nishikant Dubey again creticize Raj and Udhhav Thackeray on Mumbai after Meera Road speech : महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचं मीरारोड येथे जोरदार भाषण झालं. या भाषणात राज ठाकरे यांनी नेहमीच्या ठाकरी शैलीत (Hindi) राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट घणाघात केलाय. परंतु, या भाषणात राज ठाकरे यांनी प्रथमच गुजराती भाषिकांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. त्यावर आता एका मुलाखतीमध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंना ललकारणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मुंबई ही गुजरातचाच भाग होता. आता देखील केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. असं म्हणत पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाले निशिकांत दुबे?
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निशिकांत दुबे देशामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. सर्वांना आपआपल्या भाषेवर प्रेम आहे. त्यात मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासावर कुणीही प्रश्न उपस्थित करत नाही. आम्ही मराठी आणि मराठ्यांचा सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांशी मुस्लिमांनी दगा केला आम्ही नाही. उत्तरेत आलेले मराठा सैन्यातील अनेक लोक तेथेच स्थायिक झाले. त्यात गोविंद वल्लभपंत, यांसारख्या लोकांना उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांनी निवडून दिलं आहे. उत्तरेतील लोक देशातील सर्व लोकांना आपलं मानतात.
‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित!
त्यामुळे महाराष्ट्र देखील देशाचाच भाग आहे. कुणी कुठेही राहू शकतो. तसेच जसे सर्व भाषिकांना आपल्या भाषेचा आदर आहे. तसचं कुणी मानो किंवा न मानो हिंदीबद्दल उत्तरभारतीयांना आदर आहे. तसेच तुम्हाला इंग्रजांची इंग्रजी शिकवण्याबाबत काहीही समस्या नाही. पण हिंदीवर आक्षेप आहे. तसं पाहिलं तर मुंबई ही गुजरातचाच भाग होता. 1956 ला भाषावार प्रांतरचनेमुळे मुंबई महाराष्ट्राचा भाग बनला. आता देखील केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. तेवढेच हिंदी आणि उर्वरित इतर भाषिक आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये दिला जाणारा कर हा देशातील सर्व लोकांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा ही अधिकार आहे.
‘सत्तेची खाज आणि चोरीचा माल’; उद्धव ठाकरेंची बॅटिंग, एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
त्यामुळे जर देशभरातील उद्योगांचे जे मुख्यालयं मुंबई आणि महाराष्ट्रात आहेत. ज्यातून महारष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. तेथे अधिकारी हिंदी बोलतात. हिंमत आहे तर त्यांना काढून द्या. तसेच बॉलिवूड देखील हिंदी लोकांचं आहे. त्यांना काढून द्या. पण हा मुद्दा केवळ पालिका निवडणुकांच्या वेळी मतांसाठी करतात. त्यामुळे हिंदीला विरोध करणाऱ्या राज आणि उद्धव ठाकरेंना ते ज्या ज्या राज्यात जातील तेथे त्यांना पटक पटकके मारेंगे. असं म्हणत दुबे यांनी पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरेंना ललकारलं आहे.