BJP’s big decision before the municipal elections! aggressive leader Amit Satam elected as Mumbai BJP president : राज्यामध्ये आगामी महनगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. त्यात मुंबई महानगर पालिकेची निवडणूक भाजप आणि ठाकरे बंधुंसाठी महत्त्वाची असणार आहे. त्यात विविध मुद्दे गाजत असताना आता दोन्ही पक्षांकडून पक्ष बांधणी करण्यात येत आहे. त्यात आता भाजपने मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करत एका आक्रमक नेत्यावर मुंबईची धुरा सोपवली आहे.
चित्रपट, वेब शो आणि आता मालिका! मालिका विश्वात दिग्दर्शक, निर्माता अभिनेता आदिनाथ कोठारेच पदार्पण
भाजपने मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी 25 ऑगस्ट रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून कार्यक्रमामध्ये या नावाची अधिकृतपणे या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या अगोदर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपद होतं.
रक्तरंजित लव्ह मॅरेज! गर्भवती पत्नीची हत्या, मृतदेह ब्लेडने कापला; नदीत हात,पाय,डोके फेकले अन् धड…
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपद होतं. त्यांनी देखील उत्तम कारभार सांभाळला. तर साटम हे आभ्यासू आणि आक्रमक नेते आहेत. त्यांना मुंबईच्या राजकारणाची आणि कल्पकतेची जाण आहे. आता साटम यांच्याकडे सर्व संघटनात्मक जाबाबदाऱ्या असतील. तसेच यावेळी मुंबईवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.