Download App

भाजपचे ‘मिशन मुंबई’; जेपी नड्डा बिगूल फुंकणार

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)

Mumbai BMC police : राज्यात गेल्या दोन वर्षापासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकीचे बिगूल भाजपने फुंकले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुंबई महापालिका (Mumbai BMC) निवडणुकीची सर्व तयारी करुन घेणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला भाजपने (BJP) सुरवात केली आहे. २०१६ मध्ये भाजप आणि सेना ही निवडणूक स्वतंत्रपणे लढले होते. या निवडणुकीत सेना ८४ आणि भाजपा ८२ जागांवर येऊन थांबले होते. भाजपने एक पाऊल मागे घेत शिवसेनेला महापौर पद दिले होते.

प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून NIA ने तपास करावा..अन्यथा कायदेशीर लढाई

यंदाही निवडणूक भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे अशी होत आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून शिंदे गट हा भाजपाच्या बाजूने आहे. उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत. सध्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवदी सोबत दिसते आहे. पण नाना पटोलेंची एकला चलोची भाषा आघाडीत धडकी भरवते.

राष्ट्रवदी काँग्रेसची खरी ताकद नवाब मलिक होते. त्यांना देखील ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मनसे स्वतःच्या ताकदीवर लढत आहे. मराठी मतांमध्ये फूट पडेल का? असा प्रश्न आहे. जर मराठी मतांमध्ये फूट पाडली तर भाजपाला निवडणुक सोपी आहे. असं असलं तरी दलित आणि मुस्लिम मतांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूतीने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. या मतांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे.

दलित आणि उत्तर भारतीय मतांची मोट-
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईत येणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यात दलित, उत्तर भारतीय वोट बँककडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या कार्यक्रमात चेंबूर येथे शिवाजी महाराज पुतळ्यापासून या दौऱ्याची सुरवात होणार आहे. मानखुर्द, शिवाजीनगर, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर या पट्ट्यात विविध कार्यक्रम आयोजन होणार आहे.

‘मस्करी नाही, अरे मी खरचं पंतप्रधानाची सासू…’ सुधा मुर्तींनी सांगितला ‘तो’ किस्सा

यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना पुष्पहार अर्पण कार्यक्रम असेल. दुपारी एका दलित कार्यकर्त्यांच्या घरी जेवण घेणार आहेत. हा संपूर्ण पट्ट्यांमध्ये दलित आणि मुस्लिम मतांची संख्या खूप मोठी आहे. त्यात हा भाग नवाब मलिक यांच्या प्रभाव खाली आहे. पण सध्या मलिक हे कारागृहात असून त्यांच्या गैरहजेरीचा फायदा भाजपला अपेक्षित आहे.

दुसऱ्या टप्यात भाजपने विलेपार्ले, अंधेरी, कांदिवली, बोरिवली या आपल्या पारंपरिक उत्तर भारतीय बहुल भागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रत्येक आघाडीवर कोंडी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

Tags

follow us