BMC Election 2026 : आघाडी असो की महाविकास आघाडी यांनी मुंबईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नेहमीच होतो. मुंबईतील प्रकल्पाला जास्त निधी लागतो. त्यामुळे त्याकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष केल्याचे आरोप नेहमीच झाले आहेत. त्यात तथ्य आहे. महाविकास आघाडीच्या सरकार असताना अनेक प्रकल्पांना निधी मिळाला नाही. ते प्रकल्प सुरू झालेच नाहीत किंवा अर्धवट राहिले, असा आरोप झाला आहे. उलट भाजप (BJP) महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईच्या विकासाला (BMC Election 2026) गती मिळाली. अनेक मोठे प्रोजेक्ट मार्गी लागले. ग्रामीण भागाला निधी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) तेवढेच लक्ष मुंबईवर दिले. फडणवीसांमुळे मुंबईच्या विकासाला एकप्रकारे गती मिळते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या ताब्यात दिले, तर विकास होतो, याचा विचार मुंबईकरांनी केलेलाच असेल.
फडणवीसांकडून मुंबईवर विशेष लक्ष आणि अनेक प्रकल्प
केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 2014 ला देवेंद्र फडणवीसांच्या हाती महाराष्ट्राचा कारभार आला. देवेंद्र फडणवीसांनी आर्थिक राजधानीवर लक्ष केंद्रीत केले. मुंबईकरांना चांगल्या सुविधा देणे, नवीन प्रोजेक्ट आणणे, परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी फडणवीसांनी पावले उचलली. त्यापूर्वी अनेक प्रकल्पांची घोषणा झाली. परंतु प्रत्यक्षात जमिनीवर काहीच नाही, सर्व कागदावरच राहिले. फडणवीस यांच्या 2014 -2019 या मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात मुंबई मेट्रोचे जाळे विणणे असो, कोस्टल रोडची आखणी असो किंवा ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) ची पायाभरणी असो; या सर्व कामांना फडणवीसांनी ‘रॉकेट गती’ दिली.
विकासकामांना लागला ब्रेक !
परंतु 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मुंबईच्या विकासाला ब्रेक लावला गेला. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले अनेक निर्णय, प्रकल्पांना ब्रेक लावला गेला, याचा आरोप आजही भाजपकडून केला जातो. थेट पुरावेही दाखविले जातात. त्याचे एक उदाहरण म्हणजे मेट्रो-3 कारशेड रोखून धरण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च तब्बल दहा हजार कोटींनी वाढला. प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे मुंबईकरांना त्याचा फटका बसला.
लॉकडाउनच्या काळात मुंबई हतबल
लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांचे हाल झाले. उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय भ्रष्टाचाराचे थेट आरोप झाले. त्याचे पुरावेही समोर आले. ‘खिचडी’पासून ते ‘बॉडी बॅग’पर्यंतच्या घोटाळ्यांचे आरोप याच काळात झाले.
महायुती सत्तेत आणि पुन्हा विकासाला गती
2022 मध्ये महायुती सरकार स्थापन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील प्रकल्पांना, विकासकामांना पुन्हा एकदा गती मिळाली. फडणवीसांमुळे देशातील सर्वांत लांब सागरी सेतू विक्रमी वेळेत पूर्ण झाले. हा सेतू मुंबईकरांसाठी खुला झाला. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली. कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई ते वरळी हा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांवर आला आहे, हे केवळ महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळे शक्य झाले. ज्या बुलेट ट्रेनला ‘नको असलेला प्रकल्प’ म्हणून हिणवले गेले, त्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू आहे. मेट्रोच्या नवनवीन मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. 2024 ला पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महायुतीचे सरकार राज्यात जोरदार विकासकामे करू लागले आहे. आर्थिक ग्रोथ सेंटर मुंबईला पुढे नेले, तर राज्याचा विकास होणार या धोरणानुसार मुंबईचे अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. काही प्रकल्प सुरू आहेत.
आता मुंबई मिळविण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहे. राज्य व केंद्रात सत्ता असल्याने भाजप मुंबईसाठी मोठा निधी मिळवत राहिल, असा दावा भाजप करत आहे. त्यांचे म्हणणे बरोबर आहे कारण महापालिकेत सत्ता असेल तर केंद्राकडून प्रकल्प व निधीही मंजूर करू घेता, येतो हे फडणवीस यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. पण मुंबई पुन्हा ठाकरे, त्यांचे बरोबर असलेले महाविकास आघाडीतील पक्षांमुळे मुंबईच्या विकासकामाला पुन्हा ब्रेक लागू शकतो.
