Download App

अभिनेते जयवंत वाडकरांच्या पुतणीचा जीव घेणाऱ्या मिहीरला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

भरधाव  वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा यांचा जीव घेणाऱ्या मिहीर शाहला न्यायालायाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

  • Written By: Last Updated:

मुंबई : भरधाव  वेगात बीएमडब्ल्यू चालवून अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी कावेरी नाखवा यांचा जीव घेणाऱ्या मिहीर शाहला (Mihir Shah) न्यायालायाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, अपघातानंतर मिहीरला पळून जाण्यात मदत करण्याचे आरोप असणारे शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांनादेखील एकनाथ शिंदेंनी दणका देत त्यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. गाडीची नंबर प्लेट ही गहाळ असून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा युक्तीवाद पोलिसांचा न्यायालयात केला आहे. आरोपीला कोणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  (Warali Hit & Run Case Mumbai court Sends Prime Accused Mihir Shah To police Custody) 

नेमकी घटना काय?

वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला.

आता मराठी फिल्म इंडस्ट्री गप्प का? हे कसलं मराठीपण; वरळी हीट अँड रन प्रकरणी राऊतांचा सवाल

मी मुख्यमंत्री असेपर्यंत अन्याय होऊ देणार नाही

वरळीतील घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या जनतेला मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, प्रभावशाली असो, किंवा नोकरदार किंवा मंत्र्यांची मुलं असो, किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला वाचवले जाणार नसल्याचे सांगत कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले दिले होते. त्यानंतर अखेर राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेते पदावरून गच्छंती करण्यात आली आहे.

Mumbai BMW Hit &Run : ‘तो’ बलात्कारी आहे की अतिरेकी? शिरसाटांचं विरोधकांना सणसणीत उत्तर

जयवंत वाडकर काय म्हणाले होते?

या अपघातात आपल्या पुतणीचे प्राण गेल्याचे समजल्यानंतर जयवंत वाडकर यांची आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, वरळी अपघातातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ही विकृती आहे. गाडीसमोर एखादी व्यक्ती येते. तिला फरफटत नेऊन गाडी तशीच सोडून पळून जाता. हे वेदनादायी आहे. कावेरी, माझी सख्खी पुतणी आहे. तिने सगळं कष्ट करून हे उभं केलं होतं. तिची गणेशोत्सवामध्ये आम्हाला खुप आठवण येईल.

follow us