Mumbai BMW Hit & Run : ‘तो’ बलात्कारी आहे की अतिरेकी? शिरसाटांचं विरोधकांना सणसणीत उत्तर

Mumbai BMW Hit & Run : ‘तो’ बलात्कारी आहे की अतिरेकी? शिरसाटांचं विरोधकांना सणसणीत उत्तर

Mumbai BMW Hit & Run : मुंबईतील वरळीमध्ये (Mumbai BMW Hit & Run) एका महिलेला शिवसेना नेते राजेश शहा (Rajesh Shaha) यांचा मुलगा मिहीर शहा (Mihir Shaha) याने बेधूंदपणे कार चालवत चिरडल्याची घटना घडलीयं. या घटनेवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी विरोधकांना चांगलचं धारेवर धरलंय. वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणातला मुलगा अतिरेकी आहे का? त्याने बलात्कार केलायं का? एका पक्षाच्या नेत्याचा मुलगा म्हणून प्रकरण हायलाईट करणे चुकीचं असल्याचं प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिलंय.

20 किलोची पालखी आणि तो पेहराव…’; अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा शूटींगचा किस्सा

संजय शिरसाट म्हणाले, वरळी हिट अॅंड रन प्रकरण गंभीर असून यामध्ये कोणतीच शंका नाही. विरोधकांकडून या प्रकरणी 48 तास 50 तास झाल्याचा सूर आवळण्यात येत आहे. या प्रकरणातील मुलगा अतिरेकी आहे का त्याने बलात्कार केलायं का? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक होणारच आहे, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत कायद्यापुढे कोणीही मोठा नाही मग तो कोणत्या शहाचा मुलगा असो किंवा मुख्यमंत्र्यांचा, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

विरोधक आरोपीसोबत दारु प्यायला बसले होते का?
वरळी हिट अॅंड रन प्रकरणावरुन आरोपीला अल्कोहोल टेस्टपासून लपवून ठेवलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं असून ते म्हणाले काही लोकांना कोणत्याही गोष्टीत नाक खुपसायची सवय लागलीयं. विरोधक आरोपीसोबत दारु प्यायला बसले होते का? हा आरोप विरोधकांकडून बेछूट असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

Varun Dhavan: बाप- लेकाची जोडी पुन्हा धमाल करण्यास सज्ज; आगामी सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात

…तर श्रीकांत शिंदेंवरही गुन्हा दाखल झाला असता
आरोपीचा पबमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याबाबत शिरसाट म्हणाले, “अपघात काय होतो, आरोपीचा व्हिडिओ काय समोर येतो हे नेमके काय सुरू आहे? अपघात झाला हे प्रकरण गंभीर आहे. मात्र, आरोपी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्यांना हायलाईट करणे चुकीचे आहे. आरोपीवर कारवाई नाही झाली तर बोलणे योग्य आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणजे श्रीकांत शिंदे जरी या जागी असते तरी त्यांच्यावरही आज गुन्हा दाखल झाला असता असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube