शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये अदलाबदली, राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाटांचे सडेतोड भाष्य
Sanjay Shirsat On Sanjay Raut : शिंदे गटाने काल हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमदेवारी रद्द केली. त्याजागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी दिली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना उमेदवारी दिली. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. भाजपच्या (BJP) दबावामुळं उमेदवार बदलण्याची वेळ शिंदे गटावर आली, शिंदे गट भाजपच्या ताटाखालचं मांजर झाल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली. त्यावर आता शिंदे गटाचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली.
ईडी, सीबीआयचं नियंत्रण आठ दिवस माझ्याकडं द्या; संजय राऊत कडाडले
आज माध्यमांशी संजय शिरसाट यांनी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, त्यांना संजय राऊतांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले, लोकसभेसाठी जे उमेदवार बदलले जात आहे, हा एक पॉलिसीचा भाग आहे. हेमंत पाटील यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला. तर भावना गवळींच्या जागी राजश्री पाटलांना उमेदवारी जाहीर केली. हे दोन बदल त्यांच्याशी चर्चा करून केलेले बदल आहेत. यातही काही लोकांना वाटते आहे की शिंदे भाजपच्या दबावाखाली गेले. मात्र यात काही तथ्य नाही. जागा जाहीर करण्यापेक्षा निवडून येण्यावर आमचे जास्त लक्ष आहे, असं शिरसाट म्हणाले.
शिक्षण विभागाकडून RTE नियमांमध्ये बदल; प्राधान्यक्रमानुसारच शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार
ते म्हणाले, इतरांना काय बोलावं, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. काल उदय सामंतांनी सांगितलं की, ठाकरे गटाचे येत्या आठ दिवसांत काही आमदार आमच्यासोबत येणार आहेत. त्यामुळं राऊतांनी त्यांचा पक्ष टिकावा यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्या बालिश वक्तव्यामुळं पक्षाचा सत्यानाश झाला. आमच्या पक्षात डोकाऊ नका. आम्ही बोलयाला लागलो तर पळता भुई थोडी होईल, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
श्रीकांत शिंदे दिल्लीत जाणार नाहीत, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. त्यावर बोलतांना शिरसाट म्हणाले, संजय राऊत आमच्या आशिर्वादाने राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांना कधी निवडणूक लढली का? नगरसेवक,आमदारकी- खासदारकी कधी लढली? नाही ना…. श्रीकांत शिंदे चांगल्या मतांनी विजयी होऊन दिल्लीत जातील. ते विजयी होणार यात कोणतीही अडचण नाही. मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र एवढीच त्यांची ओळख नाही, त्यांचं काम बघा. पेंगविनपेक्षा अधिक चांगलं काम आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
ठाकरे गट हा दोन-चार महिन्याचा पक्ष आहे. या पक्षाला ना उमेदवार भेटतील, ना कार्यक्रते भेटीतील, असंही शिरसाट म्हणाले.
खैरेंना जागा दाखवू…
शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लढतीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, चंद्रकांत खैरे यांना त्यांची जागा आता दाखवून देऊ. आमची लढत एमआयएमशी असणार आहे, खैरे आमचे प्रतिस्पर्धी होऊ शकत नसल्याचं शिरसाट म्हमआले.