ईडी, सीबीआयचं नियंत्रण आठ दिवस माझ्याकडं द्या; संजय राऊत कडाडले

ईडी, सीबीआयचं नियंत्रण आठ दिवस माझ्याकडं द्या; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi),महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आपापली रणनीती आखली जात आहे. सर्वत्र जारदार सभांचा धडाका सुरु झाला आहे. एकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे यंदाची निवडणूक ही सर्वांसाठीच महत्वाची असणार आहे. विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरुन गंभीर आरोप केले जात आहेत. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या कार्यक्रमात ईडी(ED), सीबीआयच्या (CBI)एकतर्फी कारवायांवरुन निशाणा साधला आहे. तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर केला जात असल्याचीही टीका यावेळी संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे.

‘काँग्रेसची पाच सत्ताकेंद्रे एकमेकांत भांडतात’; निलंबनाच्या कारवाईनंतर निरुपम भडकले

या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला कुठलं मंत्रिपद भुषवायला आवडेल? त्यावर संजय राऊत म्हणाले की, मी कधीही मंत्रिपदाचा विचार केला नाही. इतकी वर्षे मी दिल्लीत आहे, पण मंत्रिपदाचा विचार कधी केला नाही.

दहा वर्षात मोदींनी शेतकऱ्यांचा काय विकास केला? त्यांनी फक्त….; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

असं असलं तरी मला आठ दिवसांसाठी ईडी आणि सीबीआयचं नियंत्रण माझ्याकडे हवं आहे. आठ दिवस ईडी, सीबीआय माझ्याकडं द्या, मला दाखवायचंय की, या यंत्रणा कशा काम करतात, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटून त्यातील एकेक गट भाजपसोबत जाऊन सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यावरुनही संजय राऊत यांनी जोरदार हल्लबोल केला आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, शिंदे गट आणि अजित पवार गट हे ईडी आणि सीबीआयला घाबरुन भाजपसोबत गेले आहेत.

भाजपने या दोन्ही गटांना वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ केले आहे. असं असलं तरी देखील त्यांची पाप धुतली जाणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेलेले लोक हे का गेले आहेत? हे सर्वांनाच माहिती आहे, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज