Sanjay Raut : राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राऊत म्हणाले, आता ती वेळ…

Sanjay Raut : राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राऊत म्हणाले, आता ती वेळ…

Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्याची जशी चर्चा होत असते तशीच चर्चा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे पु्न्हा (Uddhav Thackeray) एकत्र यावेत याचीही होत असते. मात्र, हा चमत्कार अजून तरी घडलेला नाही. आता लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) आल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे.

राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांचा मार्ग निवडला आहे. राज ठाकरेंना कुणीही जा म्हणून म्हणालं नव्हतं. एखाद्या घरात चार मुलं असतील तर ती त्यांच्या मार्गानं जातात. कुणी थेट अमेरिकेत जातो तर कुणी आणखी वेगळी भूमिका घेतो. या गोष्टी घडतच असतात. तसं पाहिलं तर राज ठाकरे अजूनही माझे मित्र आहेत. वेगळे जरी झालो तरी कटुता असता कामा नये असं आम्ही मानतो. कटुता आमच्यात नाही. राजकीय मार्ग वेगळे असू शकतात. एकाच घरात चार राजकीय पक्षांचे लोकही आपण पाहिले आहेतच ना, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भूमिका मांडली.

Sanjay Raut : गडकरी दिल्लीत नको म्हणून आताच त्यांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र; राऊतांचा भाजपवर घणाघात

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, ती वेळ आता निघून गेली आहे. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून 25 वर्षे होऊन गेली. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा वाटायचं जे झालं ते बरोबर नाही. पण, आता आत्मपरीक्षण केलं तर त्यांच्या लोकांनी काय मिळवलं? राज ठाकरेंना काही राजकीय फायदा झाला, तर काही नाही. याचं आत्मपरिक्षण आता त्यांनी करायला हवं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला हवेत ही भावना मराठी माणसाच्या मनात नक्कीच आहे, असेही राऊत यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज