शिक्षण विभागाकडून RTE नियमांमध्ये बदल; प्राधान्यक्रमानुसारच शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार

शिक्षण विभागाकडून RTE नियमांमध्ये बदल; प्राधान्यक्रमानुसारच शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार

RTE Rules Change by Education Department : शालेय शिक्षण विभागाने ( Education Department ) आरटीईमध्ये ( RTE ) बदल केले आहेत. त्यामुळे आता शाळांमध्ये ( School ) प्रवेशाची नियमावली देखील बदलली आहे. त्यानुसार शाळेमध्ये प्रवेश घेताना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा? याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली प्रवेश घेताना सुरुवातीला घरापासून एक किलोमीटर अंतरावरील खाजगी अनुदानित शाळेची निवड करणे बंधनकारक असणार आहे.

‘काँग्रेसची पाच सत्ताकेंद्रे एकमेकांत भांडतात’; निलंबनाच्या कारवाईनंतर निरुपम भडकले

त्यानंतर शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या दोन्ही प्रकारच्या शाळा तेवढ्या अंतरात नसल्यास शेवटचा पर्याय स्वयंअर्थसहाय्यिता शाळेचा असणार आहे. जो प्रवेशासाठी विद्यार्थ्याला निवडता येईल. या नियमानुसार पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार आहे. या प्राधान्यक्रमाव्यतिरिक्त एखाद्या पालकाला त्यांच्या परिसरातील एक किलोमीटर अंतरातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना कसाही प्रवेश घेता येणार आहे.

Bhumi Pednekar: ना दीपिका ना आलिया अभिनेत्री भूमी ठरली यंग ग्लोबल लीडर्स; म्हणाली…

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या घराच्या परिसरामध्ये खाजगी अनुदानित किंवा सरकारी शाळा नसेल. मात्र इंग्रजी माध्यमाची स्वयंअर्थसहाय्यिता शाळा असेल त्या ठिकाणी त्याला प्रवेश घेता येईल. पण त्यापूर्वी शाळेचं मॅपिंग होईल. संबंधित विद्यार्थ्यांच्या घरापासून खरंच अनुदानित किंवा सरकारी शाळा नाही. याची खात्री केली जाईल.

दहा वर्षात मोदींनी शेतकऱ्यांचा काय विकास केला? त्यांनी फक्त….; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

तर अपवादात्मक स्थितीत यापैकी कोणतीही शाळा विद्यार्थ्याच्या 1 किलोमीटरच्या परिसरात नसेल तर त्याला 3 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडता येईल. त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाकडून आरटीईच्या 25% प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक शाळांना वगळण्यात आलं आहे. मात्र सध्या समाविष्ट असलेल्या शाळांपैकी एखादी शाळा पुढील वर्षी अल्पसंख्यांक झाल्यास त्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे.

आरटीई प्रवेशासाठीची आवश्यक कागदपत्रे

– आरटीई प्रवेशासाठी गटशिक्षणाधिकारी आणि महापालिका स्तरावर कागदपत्र पडताळणीसाठी समिती असेल
– प्रवेशासाठी पालकांकडे रेशनकार्ड, वाहन परवाना, वीज, टेलिफोन किंवा मालमत्ता कराचं बिल, आधार किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बॅंकेचे पासबुक यापैंकी एक पुरावा असणे बंधनकारक आहे.
– भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांकडे प्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वीचा 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ आधिपासूनचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक
– 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, दिव्यांग विद्यार्थ्याकडे शासकीय रूग्णालयाचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
-विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे वय आवश्यक. उदाहणार्थ 2024-25 वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 31 डिसेंबर पर्यंत 6 वर्षे पूर्ण होणे गरजेचे
– पहिली ते चौथी आरटीईतून प्रवेश घेतल्यास आठवीपर्यंत परिसरातील शाळेत मोफत शिक्षण
– तसेच विद्यार्थ्याच्या आरटीई प्रवेशासाठी लागणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांपैकी बनावट कागदपत्र आढळल्यास प्रवेश रद्द होईल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज