‘महाभारत’मध्ये कृष्णाचा अवतार पुन्हा जिवंत होणार; आजपासून स्टार प्लसवर प्रदर्शित
भगवान श्रीकृष्णावर आधारित महाभारत मालिका आजपासून स्टारप्लसवर सायंकाळी 7 : 30 वाजता प्रदर्शित होणार आहे.
Mahabharat Serial : भगवान श्रीकृष्णावर आधारित महाभारत मालिका स्टार प्लसवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत भगवान श्रीकृष्णाचे विचार आणि ज्ञानाची प्रचिती एका धर्मयुद्धासोबत दाखवण्यात येणार आहे. जिओस्टार आणि कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून ही मालिका स्टार प्लसवर आजपासून प्रदर्शित होणार आहे.
एक धर्मयुद्ध आणि मनाला भावणारी कथा महाभारतमध्ये दाखवण्यात येणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने दिलेली शिकवणीसोबतच अनेक गोष्टी सांगण्यात येणार आहेत. आजच्या युगात श्रीकृष्णाने दिलेली शिकवण महत्वपूर्ण असून कृष्णाची कथा शेवटपर्यंत पाहून जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही मोठी संधी असणार आहे.
भगवान श्रीकृष्णाने अनेक अवतार घेतले असून त्यातील दशावतार, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बुद्ध आणि कल्कि असे आहेत. महाभारतमध्ये कृष्णाचे अर्जूनासोबत झालेल्या युद्धादरम्यानचा रस्ता दाखवण्यातआला असून या युद्धात पांडव जिंकले आहेत.
Phaltan Case : खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए सर्वांना… फलटण प्रकरणात धसांची एन्ट्री
या कथेला एका नव्या अंदाजात सादर करण्यात आले असून ही मालिका ऋषि वेद व्यास यांच्याद्वारे लिहीली आहे. यामध्ये अध्यात्मिक आणि भावनात्मक गोष्टींची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पौराणिक कथा आणि भावनांच्या प्रासंगिकतेला मिळवून स्टार प्लसवर ही एक नव्या युगातली मालिका सादर करण्यात येत आहे.
अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत,‘अभंग तुकाराम’ची चाहत्यांसाठी अनोखी भेट !
आपल्या कुटुंबात आजच्या दैनंदिन जीवनातील चढ उतार महाभारतातील कृष्णाचे कर्तव्य, आस्था, धर्म आणि संदेश आजही जिवंत आहे. ही मालिका फक्त इतिहासाची पुनरावृत्ती करीत नसून पृथ्वीवर कृष्णाचा अवतार पूर्ण भव्यतेने दाखवण्यात आला आहे. दरम्यान, महाभारत ही मालिका स्टार प्लसवर आजपासून 7 : ३० वाजता प्रदर्शित होणार आहे.
