धक्कादायक! RTE द्वारे प्रवेश घेतला म्हणून मुख्याध्यापिकेने दिला विद्यार्थ्याला त्रास

धक्कादायक! RTE द्वारे प्रवेश घेतला म्हणून मुख्याध्यापिकेने दिला विद्यार्थ्याला त्रास

RTE Admission : शिक्षणाची गंगा घरोघर पोहचण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत असताना अहमदनगर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरटीई अंतर्गत म्हणजेच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याचा मुख्याध्यापिकेकडून छळ केला जात असल्याचे प्रकार समोर आला आहे.

Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघनख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका

याप्रकरणी तक्रारीसाठी खुद्द नगर तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव हे सरसावले आहे. जाधव यांनी या धक्कादायक प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून योग्यती कारवाई करण्याची विनंती तक्रार अर्जात केली आहे.

अद्यापही चर्चेचा निरोप नाही; उद्यापर्यंत वाट बघणार, त्यानंतर… : मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

याबाबत अधिक माहिती अशी, खासगी शाळांत गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने आरटीई अंतर्गत खासगी शाळांना प्रवेश कोटा राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आरटीईच्या जागा सरकार प्रवेश प्रक्रिया राबवून भरत असते. यातच नगर शहरातील एका नामंकित खासगी कॉन्व्हेंट शाळेतही अशाच पद्धतीने एका चौथीच्या मुलाला प्रवेश मिळाला होता. मात्र, आरटीई प्रवेश असल्याने या शाळेतील मुख्याध्यापिका यांच्याकडून संबंधित मुलाला मानसिक, शारीरिक असा त्रास दिला जात होता.

तसेच धक्कादायक म्हणजे शिक्षकदिनीच या मुलाला चक्क मुख्याध्यापिकेने एका खोलीत डांबून ठेवले. तसेच त्याच्या जातीवरून त्याला हिनवले, असा पीडित विद्यार्थ्यांच्या पालकाने केलेला आहे. त्यांनी या संदर्भात गटशिक्षणाधिकारी जाधव यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेबाबत तक्रार दाखल केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube