Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघ नख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका

Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघ नख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला आहे. त्यात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून निशाण साधला जात आहे. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख्या इंग्लंडवरून महाराष्ट्रात येणार आहेत. त्यासाठी लंडनमधील व्हिक्टोरिया एंड अल्बर्ट या वस्तू संग्रहालायाशी चर्चा झाली असल्याची माहिती राज्यसरकारकडून देण्यात आली. मात्र या मुद्द्याचा वापर मराठा आरक्षणासह इतर प्रश्नांना बगल देण्यासाठी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर केला आहे.

अद्यापही चर्चेचा निरोप नाही; उद्यापर्यंत वाट बघणार, त्यानंतर… : मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

काय म्हणाले अमोल कोल्हे?

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख्या महाराष्ट्रात येत असेल तर चांगलं आहे. अभिमान आहे, मात्र प्रश्न आहे वेळेचा. इतर प्रश्न बाजूला ठेवून किंवा त्याला बगल देण्यासाठी अस काय होत असेल तर ते चुकीच आहे. मराठा समाज आरक्षण आम्ही सातत्याने मागत आहोत. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जावे. जाती निहाय जनगणना करण गरजेच आहे. इतर समाजावर अन्याय न होता सरकारने केली पाहीजे.’

हवं तर ‘भारत’ नाव आम्ही घेतो पण, जनतेच्या डोक्यावर.. सुळेंनी मोदी सरकारवर सुनावलं

पुढे कोल्हे म्हणाले की, धनगर समाजाच्या भावना देखील तीव्र आहेत. संविधानिक मागणी केली पाहिजे. तसेच यावेळी इतर मुद्द्यांवर बोलताना कोल्हे म्हणाले की, विखे पाटील यांच्या बाबत जी घटना घडली याच समर्थन होऊ शकत नाही. वन नेशन वन इलेक्शन झालं तर मग इतर प्रश्नाला काय महत्व राहणार आहे. हे ही बघावं लागेल. पंकजा मुंडे यांचा मी चाहता,महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे,त्याचा एक सोसियल मीडियावर व्हायरल झाला. त्यात मोदी यांच्या उज्वला योजनाच अपयश आहे. हेच कळत त्यांनी चुलीवर भाकरी केली. हे सरकारच अपयशच आहे.

https://youtu.be/PsFTp2Q_JOo?si=6gc5_QDHfxnLt5Q0

येणाऱ्या अधिवेशनात अनेक प्रश्नाची उत्तरे मिळतील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जाणीवपूर्वक असे विषय पेटवलेजातात. पोटातील भुकेला जात धर्म नसतो. त्यामुळे इतर विषय डायव्हर्ट करण्यासाठी असे विषय पेटवले जातात. असं म्हणत कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube