आव्हानांनाही आव्हान देणं माझ्या डीएनएमध्येच; रशियामधून मोदींनी जगाला ललकारलं

आव्हानांनाही आव्हान देणं माझ्या डीएनएमध्येच; रशियामधून मोदींनी जगाला ललकारलं

PM Modi challenge to worlds countries On A Visit to Russia : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांनी रात्री मॉस्कोजवळील रशियन राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी भेट घेतली. पुतिन यांनी पीएम मोदी रशिया दौऱ्यावर आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे व्यापक भू-राजकीय संदर्भ आणि संकेत म्हणून पाहिले जात आहे. यावेळी या दोघांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये मोदी यांनी म्हटलं की, आव्हानांनाही आव्हान (challenge) देणं माझ्या डीएनएमध्येच आहे. मोदी असं का म्हणाले? जाणून घेऊयात…

वडेट्टीवारांची काम थांबवण्याची मागणी; महाजनांकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, सभागृहात जोरदार घमासान

भारत आणि रशियातील संबंधांना मजबुती येण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियामध्ये अनेक करार होणार असल्याचं सांगितले जात आहे. यावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सेमी कण्डक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा. त्यामुळे जगाच्या विकासात भर पडली असून भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेत 15 टक्के योगदान देते.

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींना त्याचवेळी कानशिलात मारायला हवी होती

तसेच भविष्यात देखील वैश्विक गरिबी ते हवामान बदल अशा सर्व समस्यांना भारत टक्कर देण्यास तयार आहे. कारण आव्हानांनाही आव्हान देणे हे माझ्या डीएनएमध्येच आहे. तसेच नेत्याच्या मनात जो विचार असतो. तोच जनतेच्या मनात असतो. त्यामधून एक अपारशक्ती निर्माण होते. हीच शक्ती जागतिक विकासात लावण्यासाठी भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून चालत आहेत. असं म्हणत मोदी यांनी बदलत्या भारताबद्दल सांगितलं. तसेच भारत हा जगातील एक महत्त्वपूर्ण राष्ट्र असून उत्तरोत्तर तो अधिक प्रगती करत असल्याचं देखील मोदी यांनी या चर्चेत अधोरेखित केलं.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, ’माझ्या झोळीत…’

दरम्यान दुसरीकडे मोदी आणि पुतिन यांच्या भेटीबाबत युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनाी नाराजी व्यक्त केली आहे. झेलेन्स्की म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्षांमध्ये कीवमध्ये ज्यावेळी मुलांच्या रूग्णालयावर हल्ला झाला ज्यात 20 लोकांचा मृत्यू झाला. यादिवशी या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणे हे निराशाजनक आणि विनाशकारी असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी सोमवारी (दि.8) मॉस्कोला पोहोचण्यापूर्वी, रशियाने राजधानी कीव, नीपर, क्रिव्ही रिह, स्लोव्हियान्स्क आणि क्रॅमतोर्स्कसह युक्रेनियन शहरांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले केले, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

मोदी- पुतिन भेटीवर अमेरिकेनेही व्यक्त केली नाराजी

एकीकडे झेलेन्स्की यांनी मोदी आणि पुतिन भेटीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे अमेरिकेनेदेखील नाराजी व्यक्त केली आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत चिंता व्यक्त केली.रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचा, युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे असेही मिलर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube