मुंबईत पाऊस ओसरला; लोकल सेवा सुरळीत, ‘या’ मार्गावरील रेल्वे गाड्या झाल्या सुरू

मुंबईत पाऊस ओसरला; लोकल सेवा सुरळीत, ‘या’ मार्गावरील रेल्वे गाड्या झाल्या सुरू

Mumbai Local : मुंबईला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलच झोडपलंय. (Mumbai Rain) अशात काल झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ज्याचा चाकरमान्यांनी फटका बसला होता. अशात नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील बहुतांश मार्गावरील लोकल सेवा सुरळीत झाली आहे. (Mumbai Local) मध्य रेल्वेच्या CPRO ने दिलेल्या माहितीनुसार, ‘पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक सकाळी 4.30 वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकानुसार 2-3 मिनिटे उशिरा धावत आहेत आणि हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद,या संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

9 जुलै रोजी रेड अलर्ट

एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी, मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे अनेक गाड्या आणि उड्डाणे रद्द करण्यात आली. समुद्राच्या भरतीमुळे परिस्थिती चिघळल्याने, रेल्वे रुळ आणि भुयारी मार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. तसंच, शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवावी लागली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) कर्नाटक, गोवा अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच, या राज्यांसाठी आज, 9 जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे.

ठाण्यातही विश्रांती

मध्यरात्रीपासूनच ठाणे शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील 20 तासात ठाणे शहरात सुमारे 89.89 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात बारावीपर्यंतच्या सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून पावसाच्या विश्रांतीनंतर ठाणेकरांचा रस्ते वाहतूक व रेल्वे वाहतुकीचा प्रवास सुखकर होणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरळीत सुरु असून सध्या 2 ते 5 मिनिट उशिराने धावत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube