Salman Khan News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा (Salman Khan) धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. यातच आता पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. यावेळी थेट वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवलेल्या मेसेजमध्ये धमकी दिली गेली आहे. मेसेज करणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही धमकी बिश्नोई टोळीकडूनच दिली गेली असावी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या नव्या धमकीने मोठी खळबळ उडाली आहे. मागील आठवड्याच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची (Baba Siddiqui) गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याची बिश्नोई गँगने कशी केली निवड?, वरातीतल्या गोळीबाराची खतरनाक कहाणी
मुंबई वाहतूक पोलिसांना एक धमकीवजा मेसेज मिळाला. यामध्ये लॉरेन्स बिश्नोईबरोबर सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपये मागण्यात आले. जर सलमान खानने पैसे दिले नाही तर बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था होईल, अशी धमकी देण्यात आली. हा मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्यात आला. या मेसेजला हलक्यात घेऊ नका असा इशाराही देण्यात आला आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई बरोबरचा वाद मिटवायचा असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील. जर नाही दिले तर बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था होईल असा इशारा या मेसेजमध्ये देण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या धमकीची (Mumbai Police) गांभीर्याने दखल घेतली आहे. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत सलमान खानचे कुटुंबिय प्रचंड धास्तावले आहेत. त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोईने घेतली आहे. परंतु, सलमान खानला दिल्या जात असलेल्या धमक्या म्हणजे एक मोठं षडयंत्र दाबण्याचा प्रयत्न असू शकतो.
सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितलं की जेलमध्ये असताना कुणाला काम करणे खरंच इतके सोपे असू शकते का. सलमान खानला घाबरवण्यासाठी कोण बाबा सिद्दीकीवर हल्ला करू शकतो का? हे सगळंच संशयास्पद वाटत आहे. या धमकीनंतर मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा; मध्यरात्री सलमान खान लीलावती रुग्णालयात दाखल