बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा; मध्यरात्री सलमान खान लीलावती रुग्णालयात दाखल
Baba Siddiqui Death : बाबा सिद्दिकी यांच्या निधनाच्या बातमीनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मध्यरात्री अडीच वाजता सलमान खान लीलावती रुग्णालयात पोहोचला. सलमान आणि बाबा सिद्दिकी यांची मैत्री सर्वश्रुत होती. त्यांची मैत्री अनेक वर्षांची होती. बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर सलमानने त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन केलं.
अभिनेता संजय दत्त
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनीही रुग्णालयात पोहोचून सिद्दिकी परिवाराची भेट घेतली. याशिवाय अभिनेता संजय दत्त यांनी देखील थोड्या वेळापूर्वी रुग्णालयात येऊन बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लीलावती रुग्णालयात पोहोचले. बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर ते जीशान सिद्दिकी यांना सांत्वन करण्यासाठी आले होते. बाबा सिद्दिकी यांचं निधन हा एक मोठा धक्का असून, त्यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
तपासाची दिशा
मुंबई पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत हल्लेखोरांना अटक केली आहे आणि घटनास्थळी सापडलेल्या 9.9 MM पिस्तुलला ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्तीही जखमी झाला आहे, त्याला देखील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय घडल
बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. विरोधीै पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.