Download App

Video : पार्थ पवार अन् जॅकलिनने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; दानपेटीत टाकण्यासाठी पैसेही दिले

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अवनीत कौर यांनी दर्शन घेतले.

Mumbai News : राज्यात काल घरोघर गणरायाचं मोठ्या उत्साहात (Ganesh Festival) आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. मुंबईतही गणरायाचं (Mumbai Ganesh Festival) अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सार्वजनिक गणेश मंडळातही अगदी वाजतगाजत बाप्पा विराजमान झाले. तसं पाहिलं तर मुंबईचा गणेशोत्सव देशविदेशात प्रसिद्ध आहे. येथील लालबागच्या राजाचं विशेष आकर्षण आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात. गणरायाचं दर्शन घेतात. यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान (Social Media) व्हायरल होत आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अवनीत कौर यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील होते. लालबागच्या राजाचं दर्शन घेताना पार्थ पवार यांनी जॅकलीनला गणरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी पैसे देखील दिले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Mumbai, Maharashtra: Actress Jacqueline Fernandez participated in Ganesh Chaturthi celebrations at the Lalbaugcha Raja pandal

(Video Source: Lalbaugcha Raja/YouTube) pic.twitter.com/NKKyJJ8p93

— IANS (@ians_india) August 27, 2025

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशातून भाविक येत असतात. सध्याच्या गणेशोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी येथे गर्दी वाढली होती. याचवेळी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अवनीत कौर देखील येथे उपस्थित होत्या. यावेळी पार्थ पवार यांनी आरती झाल्यानंतर दानपेटीत टाकण्यासाठी जॅकलिनला पैसे देखील दिले.

यावेळी अवनीत कौरसोबत निर्माता राघव शर्माही होता. यावेळी येथे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या सेलिब्रिटींचाही गोंधळ उडाला होता. तरीदेखील जॅकलिनने लोकांना हात जोडून अभिवादन करून आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत हा प्रसंग हाताळला. करिअरबद्दल सांगायचं झालं तर जॅकलिन काही दिवसांपूर्वी अक्षयकुमारच्या हाऊसफुल 5 मध्ये दिसली होती. आता जॅकलिन अक्षयकुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, दिशा पाटनी आणि अन्य कलाकारांसोबतच्या वेलकम टू द जंगलमध्ये झळकणार आहे.

Housefull 5: अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ मध्ये स्टार जॅकी श्रॉफची एंट्री, चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल आले समोर!

follow us