Download App

हल्ल्यानंतर सैफ-करिना अलर्ट, मुलांच्या सुरक्षिततेसाठी घेतला ‘हा’ निर्णय

खान फॅमिलीने पापाराझींना विनंती केली आहे की आमच्या मुलांचे फोटो घेऊ नका. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नका.

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan) झाला होता. या हल्ल्यानंर सैफच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबाचीही विशेष काळजी घेतली जात आहे. यानंतर आता खान कुटुंबियांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. खान फॅमिलीने पापाराझींना विनंती केली आहे की आमच्या मुलांचे फोटो घेऊ नका. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नका तसेच त्यांना कुठेही अप्रोच होऊ नका अशी विनंती केली आहे.

माहितीनुसार, सैफ आणि करिनाच्या पीआर मॅनेजरने पापाराझींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सैफ आणि करिनाने ज्या काही सूचना दिल्या आहेत त्यांची माहिती दिली. यानंतर त्यांनी पापाराझींना विनंती केली की तैमूर आणि जेह यांचे फोटो घेऊ नका. त्यांचा पाठलाग करू नका. ही मिटींग मंगळवारी पीआर मॅनेजरच्या कार्यालयात घेण्यात आली. यानंतर मॅनेजरने आणखीही काही सूचना पापाराझींना दिल्या.

पतीवरच्या हल्ल्यानंतर अभिनेत्री करिनाची पहिली पोस्ट; मीडिया अन् पापाराझींना केलं ‘हे’ आवाहन

कार्यक्रमात फोटो घेता येतील

करिना आणि सैफचे फोटो घेण्यास कोणतीही मनाई नाही. जर ते एखाद्या कार्यक्रमात भाग घेत असतील त्यावेळी त्यांचे फोटो घेता येतील. घराच्या खाली उभे राहू नका. घरातून कुणी बाहेर चालले असेल अथवा घरी जात असेल अशा वेळीही फोटो घेऊ नका अशी विनंती पापाराझींना करण्यात आली आहे. यानंतर आता पापाराझींकडून या विनंतीला मान दिला जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सैफबाबत नेमकं काय घडलं होतं?

चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी 16 जानेवारीला त्याच्या घरात घुसला आणि त्याने सैफवर सपासप वार केले. याच एका विचाराने अनेकांनी हैराण केलं आहे. या भागात सेलिब्रिटी व्यक्ती राहतात. त्यामुळे येथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे हा संशोधनाचा विषय ठरेल. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तर या भागात खासगी सुरक्षा व्यवस्थाही आहेच. अभिनेते आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेची व्यवस्था केली आहेत. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.

अवघ्या ४ तासांत २५ लाखांची मंजुरी कशी?, सैफच्या उपचारांवरून विमा कंपनीवर AMC कडून तक्रार

follow us