पतीवरच्या हल्ल्यानंतर अभिनेत्री करिनाची पहिली पोस्ट; मीडिया अन् पापाराझींना केलं ‘हे’ आवाहन

  • Written By: Published:
पतीवरच्या हल्ल्यानंतर अभिनेत्री करिनाची पहिली पोस्ट; मीडिया अन् पापाराझींना केलं ‘हे’ आवाहन

Kareena Kapoor Khan Statement on Saif Ali Khan attack : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर दोन दिवसांपूर्वी त्याच्या वांद्रे येथील घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं लिलावती रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली करिना?

आमच्या कुटुंबासाठी हा एक धक्कादायक आणि आव्हानात्मक दिवस होता. आम्ही अजूनही आमच्यासोबत घडलेल्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की, मीडिया आणि पापाराझींनी कोणताही अंदाज बांधणं आणि कव्हरेज टाळावं. आम्हाला तुमच्या आणि पाठिंब्याचा आदर आहे.

सलमान खानपासून ते सैफ अली खानपर्यंत हे बॉलिवूड स्टार्स ठरले अपहरण आणि हल्ल्यांचे बळी

करिनानं सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “या प्रकरणाबाबत सातत्यानं होणारा तपास आणि अटेंशन आमच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे. मी तुम्हाला विनम्रतेनं आवाहन करते की, तुम्ही आमच्या मर्यादेचा सन्मान करावा आणि आम्हाला ती स्पेस द्यावी जी आम्हाला एक कुटुंब म्हणून सावरण्यासाठी आणि या कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे. मी या संवेदनशील काळात तुमचं सामंजस्य आणि आपुलकीसाठी तुम्हाला अॅडव्हान्समध्ये धन्यवाद म्हणते.

सैफ आता धोक्याच्या बाहेर

सैफ अली खानला या घटनेच्या काही वेळातच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा अडकला होता, जो शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात आला. तसंच, काही ठिकाणी प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आली. आता सैफच्या जीवीताला कोणताही धोका नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube