Saif Ali Khan : निष्क्रिय गृहमंत्री! जीवघेण्या हल्ल्याला गांभीर्याने घेण्याऐवजी फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त, कॉंग्रेसचे टीकास्त्र

  • Written By: Published:
Saif Ali Khan : निष्क्रिय गृहमंत्री! जीवघेण्या हल्ल्याला गांभीर्याने घेण्याऐवजी फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त, कॉंग्रेसचे टीकास्त्र

Nana Patole : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला झाल्याची घटना समोर आली. सैफ अली खान त्याच्या घरी असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर महायुती (Mahayuti) सरकारवर चौफेर टीका होत आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंन (Nana Patole) यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) बोचरी टीका केली.

Video : … आता मात्र भीती वाटायला लागलीये; सैफवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेचं विधान चर्चेत 

नाना पटोलेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सैफ अली खानवर झालेला खुनी हल्ला हा महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणार आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या परिसरात अशा घटना घडत असतील, तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी आणि नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता, राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप युती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावे असून सैफ अली खानवरील हल्ला हे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेला गुंडांनी उभे केलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले हे या सरकारचे अपयश आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

Video : मुंबई असुरक्षित म्हणणे चुकीचे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया 

फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री
पुढं ते म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांचे मनोबल वाढले असू्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलिस महासंचालक अत्यंत निष्क्रिय आहेत. मुंबईत दोन पोलिस आयुक्त आहेत, तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्ता आहे ना मुंबईत. बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशिर्वाद, परभणीमध्ये पोलिस कोठडीत मृत्यू, वांद्रे येथे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. . फडणवीस गृहमंत्रीपद सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. राज्यात सेलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही, असं ते म्हणाले.

कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी
ते म्हणाले की, गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असतांना फडणवीस गंभीर नसल्याचं दिसतं. सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याला गांभीर्याने घेण्याऐवजी, मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय आणि कमजोर महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube