Bomb threat : मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ईमेलवरुन आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया (Khilafat India) या ईमेल अकाउंटवरुन ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra | RBI received a threatening email, in the email, it was said that bombs would be planted in RBI office, HDFC bank and ICICI bank and demanded the resignation of RBI governor Shaktikanta Das and Union Finance Minister Nirmala Sitharaman. A total of 11 bomb threats…
— ANI (@ANI) December 26, 2023
धमकी देणाऱ्या मेल मध्ये म्हटले आहे की दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होतील. यानंतर पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोधमोहीम केली होती. पण काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; संरक्षणमंत्र्यांचा इशारा
आरबीआयच्या ऑफिशियल मेलवर बाँब ठेवल्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आरबीआय कार्यालयाने पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी त्यांच्या बाँब स्कॉडच्या मदतीने शोध सुरु केला आहे. पण त्यामध्ये काहीही आढळलं नसल्याचे समोर आलं आहे. पण हा मेल कुठून करण्यात आला आहे आणि त्याचा उद्देश काय आहे याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे.