Dhangar reservation : गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येत होते. यामुळे धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत होती. यासंदर्भात याचिका मुंबई हायकोर्टात (High court) दाखल केलेली होती. या संदर्भातील सर्व याचिका मुंबई कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला हायकोर्टाने नकार दिला आहे.
एसटीमधून आरक्षणासाठी धनगर समाजाने मोठा लढा उभारला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत असताना कोर्टाचा हा निकाल धनगर समाजासाठी धक्का देणारा आहे. आरक्षणासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावल्या आहेत.
काँग्रेसला दिलासा ! गोठवलेले बॅंक खाते पुन्हा सुरु, ITAT ने दिला आदेश
दरम्यान धनगर आरक्षणासंदर्भात अनेक याचिका हायकोर्टात दाखल झालेल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून यावर सुनावणी सुरु होती. याप्रकरणी दिलासा देण्यात नकार दिला आहे. धनगर समाजाची मागणी होती की एनटीमधून एसटीमध्ये आरक्षण मिळावं, यामुळे साडेतीन टक्क्यांवरुन थेट सात टक्क्यांपर्यंत होणार होतं.
विधान परिषदेला विसरले, राज्यसभेला डावलले… हर्षवर्धन पाटलांवर आता थेट केंद्रात नवी जबाबदारी
परंतु यासाठी ज्या गोष्टींची पुरतता आणि पडताळणी आवश्यक होती त्या पूर्ण होत नाहीत. या निकषावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती गौतम पटेल आणि कमल काथा यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. ह्या मागण्या रास्त नसून मान्य करण्यात येण्यासारख्या नाहीत, असा निर्वाळा देत सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.
Gulabrao Patil : उद्धवसाहेबांचं पिल्लू ते राऊत नावाचं कार्टून; गुलाबराव पाटलांचा जोरदार हल्लाबोल
सरकारी नोकऱ्यात आणि शिक्षणात हे आरक्षण लागू करावे. आरक्षणाला मंजुरी मिळूनही योग्य प्रवर्गातून मिळत नाही. आमच्यावर गेली अनेक वर्षे अन्याय होतोय. अशी मागणी करणारी याचिका होती. पण आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर धनगर समाजाला सुप्रीम कोर्टात अपील करता येणार आहे.