Reliance Job Cut : भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) अलीकडेच मोठी (Reliance Job Cut) कर्मचारी कपात केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की कंपनीने 2023-24 या आर्थिक (Reliance Industries) वर्षात तब्बल 42 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. या निर्णयामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांनी कमी झाली आहे. कंपनीच्या रिटेल डिविजनवर कर्मचारी कपातीची कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. आता इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी कपात होते आणि तीही अंबानींच्या (Mukesh Ambani) नावाजलेल्या कंपनीत म्हटल्यावर उद्योग जगतात खळबळ उडणारच. आता याच कर्मचारी कपातीची चर्चा सुरू झाली आहे. अनेक तज्ज्ञांनी कंपनीच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.
कंपनीचा हा निर्णय म्हणजे एका रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. 2022-23 या वर्षात कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3.89 लाख होती आता यात कपात होऊन 2023-24 या वर्षात 3.47 ला इतकी झाली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात नव्या भरतीत एक तृतीयांश कपात झाली आहे.
रिलायन्स जिओच्या रिचार्जला BSNL ची टक्कर; १६० दिवसांच्या प्लानमध्ये पैशांचीही होईल बचत
कंपनीच्या या निर्णयाने चिंतेचं वातावरण तयार केलं आहे. कंपनीचा किरकोळ बाजार एकूण कर्मचाऱ्यांच्या 60 टक्के आहे. कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका याच क्षेत्राला बसला आहे. किरकोळ बाजार भागात 2022-23 या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या 2.45 लाख होती ती आता 2023-24 या वर्षात 2.07 लाख इतकी राहिली आहे.
याबरोबरच काही स्टोअर देखील बंद करण्यात आल्याने मंदी दिसून येत आहे. रिलायंस रिटेलने 2022-23 या वर्षात 3 हजार 300 पेक्षा जास्त स्टोअर सुरू केले. 2023-24 मध्ये फक्त 800 स्टोअर सुरू करता आले. यानंतर कंपनीच्या एकूण रिटेल स्टोअर्सची संख्या 18 हजार 836 रुपये इतकी झाली आहे. रिलायन्स जयो या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीतही कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 95 हजार 326 होती ती 2024 मध्ये 90 हजार 67 इतकी राहिली आहे.
कंपनीचे परिचालन व्यवस्थित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. कपातीचा निर्णय योग्यच आहे असे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. परंतु आर्थिक प्रभावाच्या बाबतीतही काही गोष्टी यातून स्पष्ट होत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज मोठी कंपनी आणि त्यात मोठी कर्मचारी कपात अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हाने उभी राहत असल्याचे संकेत देत तर नाही ना अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
मुकेश अंबानींनी रचला इतिहास! रिलायन्स बनली देशातील पहिली 20 लाख कोटींची कंपनी