Share Market Crash : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला अमेरिका. या देशाच्या शेअर बाजारात हाहाकार (Share Market Crash) उडाला असून त्याचा इफेक्ट आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. भारताचा शेअर बाजार देखील गडगडला. अमेरिकेत फेड रेट कट निर्णयानंतर शेअर बाजारात वेगाने घसरण झालाी. अमेरिकी फेडरल रिजर्व बँकेने व्याजदरात 0.25 टक्के कपातीचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. सलग तिसऱ्यांदा कपातीचा निर्णय घेण्यात आला. या कारणामुळे शेअर बाजाराचा मूड बिघडला आणि ग्लोबल मार्केटसह भारतीय शेअर बाजारावर याचा परिणाम दिसून आला.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका, सेन्सेक्स 1064 अंकांनी घसरला, हे आहे कारण
आज गुरुवार सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ९०० अंकापेक्षा जास्त अंकांनी घसरला. तर निफ्टीतही ३२१ अंकांची घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात पुन्हा कपात केली. त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाला. इतकेच नाही तर अमेरिकी बँकेने पुढील वर्षात दोन कपातीचे संकेत दिले तर मार्केट क्रॅश झाले. या कारणामुळे सेन्सेक्स ७९००० पर्यंत आला आणि निफ्टी सुद्धा २३९०० पर्यंत खाली आला.
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ५.९३ लाख कोटी रुपयांनी घसरले. म्हणजेच गुंतवणूकदारांचे ५.९३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सध्या सेन्सेक्स १००१ अंकांच्या घसरणीस ७९१७२ आणि निफ्टी २९१ अंकांच्या घसरणीसह २३९०१ अंकांवर व्यवहार करत आहे. इंट्रा डे मध्ये सेन्सेक्स ११६२ आणि निफ्टीत ३२८ अंकांची घसरण झाली आहे.
याआधी बुधवार बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ४,५२,६०,२६६.७९ करोड रुपये होते. आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच यामध्ये घसरण होऊन ४,४६,६६,४९१.२७ वर आला. म्हणजेच गुंतवणूकदारांची ५,९३,७७५.५२ कोटी रुपयांची रक्कम कमी झाली आहे. दरम्यान, आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतरची बाजारातील ही स्थिती आहे. दिवसभरात यामध्ये आणखी बदलही होऊ शकतो.
ऐन दिवाळीत शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांना धक्का, सेन्सेक्स 553 अंकांनी घसरला